मुरघास निर्मितीसाठी ७ हजार किलो मका बियाण्याचे वाटप येवला : सुधारित चारा पिकांच्या लागवडीतून वर्षभराच्या चारा उपलब्धतेचे नियोजन

मुरघास निर्मितीसाठी ७ हजार किलो मका बियाण्याचे वाटप येवला : सुधारित चारा पिकांच्या लागवडीतून वर्षभराच्या चारा उपलब्धतेचे नियोजन
Published on: 
पान-३ अँकर फोटो-27420 येवला : मुरघास तयार करून साठवणूक करताना शेतकरी. मुरघास निर्मितीसाठी मका बियाण्यांचे वाटप येवला : चारा पिकांच्या लागवडीतून वर्षभराच्या चारा उपलब्धतेचे नियोजन सकाळ वृत्तसेवा येवला, ता. ६ : पशुधनासाठी वर्षभर पौष्टिक चारा उपलब्ध होऊन भविष्यातील चाराटंचाईची तीव्रता कमी व्हावी, यासाठी पशुसंवर्धन विभागाने मुरघास निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी तालुक्याला सात हजार किलो सुधारित मका बियाणे उपलब्ध करून दिले आहे. हे बियाणे फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या आणि पशुपालकांना वितरित करण्यात आले. यामुळे चारा उत्पादन वाढविण्यासह दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पशुपालकांना मोठा आधार मिळणार आहे. पावसाच्या कमतरतेमुळे खरिपासह चारा उत्पादनावरही परिणाम झाल्याने दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे संगोपन करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागामार्फत तालुक्यातील चारा उत्पादन वाढविण्यासाठी सुधारित चारा पिकांच्या बियाण्यांची मागणी जिल्हास्तरावर नोंदविण्यात आली होती. त्यानुसार मुरघास निर्मितीसाठी उपयुक्त असलेल्या सुधारित मका जातींचे सात हजार किलो बियाणे तालुक्यास प्राप्त झाले. या बियाण्यांचे येथील पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयात वितरण करण्यात आले. तहसीलदार आबा महाजन, मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, पशुसंवर्धन विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. मेघा पाटील, सहाय्यक आयुक्त डॉ. जगदीश पालवे, पशुधन विकास अधिकारी डॉ. अनंथ्रे, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी-कर्मचारी, फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांचे प्रतिनिधी आणि पशुपालक उपस्थित होते. दरम्यान, मका हे मुरघास निर्मितीसाठी उपयुक्त पीक मानले जाते. मक्यापासून तयार केलेला मुरघास साठवून ठेवल्याने हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी असलेल्या काळातही पशुधनाला पौष्टिक चारा देता येतो. त्यामुळे केवळ सध्याची चारा गरज भागविण्याऐवजी भविष्यातील टंचाईचा विचार करून चारा साठवणुकीचे नियोजन करणे शक्य होणार आहे. याशिवाय सुधारित ज्वारीची (सुगरग्रज) आणि आफ्रिकन टॉल या चारा पिकांचे बियाणेही लवकरच तालुक्यास उपलब्ध होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली. विविध चारा पिकांच्या लागवडीला चालना मिळाल्यास तालुक्यातील चारा उत्पादनात वाढ होऊन दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे संगोपन करण्यासाठी पशुपालकांना दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.