esakal | रमजानच्या ‘नान’चा स्वाद ब्रेक द चेनमुळे दरवळलाच नाही

बोलून बातमी शोधा

bun in ramazan

रमजानच्या ‘नान’चा स्वाद ब्रेक द चेनमुळे दरवळलाच नाही!

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : रमजान पर्व म्हटले, की नान(bun), खजूर(Dates), सुतरफेणी, सुकामेवा(dry fruits) यासह शेकडो खाद्यपदार्थांची रेलचेल असते. कोरोना संसर्गामुळे सलग दुसऱ्या वर्षीही खाद्यपदार्थ मिळणे दुर्लभ झाले आहे. नान (मोठ्या आकाराचा गोल पाव) हा प्रामुख्याने बेकरीचालक रमजान काळातच तयार करतात. पूर्व भागाबरोबरच पश्‍चिम भागातील हिंदू बांधवही नानची प्रतीक्षा करीत असतात.(Corona breaks food purchases during Ramazan this year)

यंदा रमजानच्या खरेदीला ब्रेक

‘ब्रेक द चेन’ (brake the chain) च्या निर्बंधांमुळे बेकऱ्या फक्त सकाळी अकरापर्यंतच सुरू असतात. त्यातच फक्त नान खरेदीसाठी पूर्व भागात जाणेही जिकिरीचे होते. यामुळे यंदा रमजानच्या नानचा स्वाद पश्‍चिम भागात दरवळलाच नाही. शहरात २० रुपये किमतीपासून शंभर रुपयांपर्यंत विविध प्रकारचे नान तयार होतात. यात साधा नान, चेरी, मावा, काजू, ड्रायफ्रूट्स मिक्स नान असे अनेक प्रकार असतात.

हेही वाचा: ग्राउंड रिपोर्ट : जिल्हाबंदीचे वाजलेत तीन तेरा; पाहा VIDEO

कोरोनामुळे प्रशासनही हतबल

रमजान काळात पूर्व भागाबरोबरच पश्‍चिम भागातही नान विक्री करणाऱ्या हातगाड्या दिसून येत. कोरोना संसर्गामुळे सर्वच प्रकारच्या स्ट्रीट फूडला लगाम लागला आहे. शहरातील खाऊगल्ली, मसगा महाविद्यालय चौपाटी यावरील गजबजही दिसून येत नाही. एक महिन्याचे कठोर निर्बंध रस्त्यावरील खाद्यपदार्थ व फेरी विक्रेत्यांच्या मुळावर उठले आहे. शासनाने आर्थिक दुर्बल व दारिद्र्यरेषेखालील विक्रेत्यांना मदत करावी, अशी मागणी हॉकर्स युनियनने केली आहे. पूर्व भागात या मागणीसाठी यापूर्वीच काँग्रेस व जनता दलातर्फे मोर्चाही काढण्यात आला होता. वाढत्या कोरोना संसर्गामुळे मात्र प्रशासनही हतबल झाले असून, निर्बंधांचे कठोर पालन व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा: 18 दिवसांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या