नाशिक : कोरोनाने निराधार झालेली ५६ बालके घेतली दत्तक

जिल्ह्यातील ४० महसूल आधिकाऱ्यांचा अनोखा उपक्रम
Suraj Mandhare
Suraj Mandhareesakal
Updated on

नाशिक : कोरोनात अनाथ झाल्याने ‘पोरकेपणाची सल'' अनुभवणाऱ्या ५६ बालकांना जिल्ह्यातील ४० महसूल आधिकाऱ्यांनी दत्तक घेतले आहे. जिल्ह्यातील सगळ्या प्रमुख महसूल आधिकाऱ्यांनी कोरोनाने निर्माण केलेली पोकळी भरुन काढण्याचे ठरविले आहे. निराधार बालकांचे कायमस्वरुपी मित्ररुपी शाश्‍वत पालक होण्याचा या आधिकाऱ्यांचा निर्णय अनुकरणीय ठरावी, अशीच ही उदाहरणं आहेत. यात, स्वत: जिल्हाधिकारी सूरज मांढरे, दोन्ही अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसिलदारांपर्यंत ४० अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

कोरोना महामारीचा अनपेक्षित धक्का प्रत्येकाला खूप काही शिकवून गेला. अनेकांना तर कायमचा पोरकं करून गेला. कधीही भरुन न येणारी ही पोरकेपणाची उणीव भरून काढण्यासाठी जिल्ह्यातील महसूल आधिकाऱ्यांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांच्यासह उपजिल्हाधिकारी व प्रांताधिकारी दर्जाच्या आधिकाऱ्यांनी एक व दोन पालक गमावलेल्या ५६ बालकांना दत्तक घेतले आहे. जिल्हाधिकारी मांढरे यांनी दोन जुळ्या मुली दत्तक घेतल्या आहेत. त्यात, शासकीय योजनां व्यतिरिक्त संबंधित मूलांच्या अडी-अडचणींवर हे आधिकारी संबधित मूल सज्ञान होईपर्यंत कायम लक्ष ठेवून शाश्‍वत स्वरुपाची मदत करणार आहेत. इतर ठिकाणी अनेकांनी अनुकरण करावे, असा हा उपक्रम आहे.

दत्तक घेतलेल्या चिमुकलीसोबत जिल्हाधिकारी सुरज मांढरे व सौ. मांढरे
दत्तक घेतलेल्या चिमुकलीसोबत जिल्हाधिकारी सुरज मांढरे व सौ. मांढरेesakal

स्वखर्चातून शाश्‍वत आधार

दोन्ही पालक गमावलेल्या निराधारांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून पाच लाखांची मुदतठेव, एक पालक गमावलेल्या पाल्यांना शैक्षणिक साहित्यासाठी वर्षाला १० हजारांची शैक्षणिक मदत देण्यात येणार आहे. पण, निराधारांना पैसे दिले म्हणजे त्यांच्या आयुष्यातील पोरकेपण दूर होईल, असे नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ‘मिशन वात्सल्य योजने’तून ४६ शासकीय योजनांचा लाभ द्यायचा, सगळ्यांना सानुग्रह मदत, दर महिण्याला अकराशे रुपये शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्यासाठी १० हजार रुपये, तसेच स्व-खर्चातून पालकत्वाच्या भूमिकेतून या अनाथ बालकांच्या शाश्‍वत पुनर्वसनासाठी हे आधिकारी मूलं सज्ञान होईपर्यंत किंवा कदाचित त्यापुढेही कायमस्वरुपी मित्ररुपी पालक बनून राहणार आहेत. जिल्ह्यात साडे ८ हजाराहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला. त्यात, ७७८ बालकांनी त्यांचे एक पालक, तर २४ बालकांनी दोन्ही पालक गमावले आहेत. १९ वर्षावरील ५० मूलांचा यात समावेश आहे. सध्या त्यापैकी अनेक बालकं जवळच्या नातेवाईकांवर अवलंबून आहेत. काही जणांना ज्येष्ठ व वयोवृद्ध आजी किंवा आजोबा हेच आधार आहेत. अशा निराधारांच्या मनातील पोरकेपणाची सल दूर करीत, त्यांच्या आयुष्याला आकार देण्याचा हा प्रशासकीय आधिकाऱ्यांचा सांघीक प्रयत्न आहे. कुणीतरी आमच्या पाठिशी आहे, ही भावना या बालकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
MP Supriya Sule
Harshada Patil
Marathi News Esakal
www.esakal.com