दिलासादायक : नाशिकमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर घटतोय!

मार्चपासून उचल खाल्लेल्या कोरोना संसर्ग(corona virus) शहरात झपाट्याने कमी होत असल्याचे चित्र असून, गुरुवारी (ता.१३) कोरोना बाधितांचा आकडा ९९९ पर्यंत खाली आला आहे.
corona virus
corona virusesakal

नाशिक : मार्चपासून उचल खाल्लेल्या कोरोना संसर्ग(corona virus) शहरात झपाट्याने कमी होत असल्याचे चित्र असून, गुरुवारी (ता.१३) कोरोना बाधितांचा आकडा ९९९ पर्यंत खाली आला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचा(covid positive) दर दहा टक्क्यांवर आल्याने ही बाब समाधानकारक असून, गेल्या अडीच महिन्यात प्रथमच ऑक्सिजन बेडची(Oxygen bed) प्रतीक्षा यादी संपुष्टात आल्याचे दिसून येत आहे. (Corona positivity rate is declining in Nashik)

अडीच महिन्यानंतर प्रतीक्षा यादी संपुष्टात

फेब्रुवारीच्या अखेरीपासून शहरांमध्ये कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढला. गेल्या वर्षाच्या तुलनेत सहा ते सातपटीने संसर्गाचा वेग असल्याने प्रशासनाच्या पायाखालची वाळू घसरली. महापालिकेच्या बिटको व झाकिर हुसेन रुग्णालयांमध्ये नियमित व ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यात आली. बिटको रुग्णालय हे सध्या उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयात सातशे बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. मार्च-एप्रिल महिन्यामध्ये दोन्ही रुग्णालयांमध्ये बेड मिळत नव्हते. ३५ ते ४० रुग्णांचे दररोज वेटिंग असल्याने रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय विभागाला तारेवरची कसरत करावी लागली. डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात १२१ ऑक्सिजन बेडचे क्षमता असताना चाळीस अतिरिक्त खाटांवर ऑक्सिजनचे सिलिंडर लावून रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आली. सध्या या रुग्णालयांमध्ये नियमित १२१ ऑक्सिजन बेडपैकी तीन बेड रिक्त आहे, तर बिटको रुग्णालयात पन्नास सर्वसाधारण बेड रिक्त आहे. ३२५ ऑक्सिजन बेडची यादी संपली आहे.

corona virus
कोरोना उतरणीला मात्र इभ्रत टांगणीला! नाशिक मार्केट गर्दीचे फोटो देशभर VIRAL

संसर्गाचा दर दहा टक्क्यांवर

फेब्रुवारी २०२१ मध्ये रुग्णसंख्येचा दर ९७.२ ७२ टक्क्यांवर पोहोचला होता. मार्च-एप्रिल महिन्यात एक लाख कोरोना रुग्ण वाढले होते. विविध उपाययोजना नंतर आता कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण संख्या घटत असून सध्या दहा हजार ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. गुरुवारी ९९९ कोरोनाबाधित आढळल्याने पॉझिटिव्ह दर ४० टक्‍क्‍यांवरून १० टक्क्यांवर आल्याचे दिसून आहे.

corona virus
Good News : सिटी स्कोअर २४ असतानाही रुग्णाला ठणठणीत बरा करण्यास डाॅक्टरांना यश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com