नाशिक : ग्रामीण भागाने धुडकावली तिसरी लाट

Corona Fight
Corona Fightesakal

नाशिक : कोरोनाच्या (Corona) पहिल्या व दुसऱ्या लाटेने शहरासह जिल्ह्यात हाहाकार उडविल्यानंतर तिसरी लाट (Third wave) दोन्ही लाखांपेक्षा अधिक उपद्रवी असेल हे भाकीत ग्रामीण भागाने खोटे ठरवले आहे. आतापर्यंत मागील दोन वर्षाच्या तुलनेत कमी प्रमाणात म्हणजे १८ हजार ८२८ रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेचा जीव भांड्यात पडला. कोरोनाच्या एकूण आकडेवारींमध्ये सर्वाधिक कमी रुग्ण पेठ व सुरगाणा या आदिवासी तालुक्यांमध्ये आढळल्याने रोगप्रतिकारशक्ती दांडगी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

कोरोनामहामारीने मार्च २०२० पासून शहरासह ग्रामीण भागात हैदोस घातला. पहिल्या व दुसऱ्या लाटेत जवळपास एक लाख ५८ हजार २७७ कोविड रुग्ण आढळले. सर्वाधिक रुग्ण निफाड तालुक्यात २५ हजार ९७० आढळले. पाठोपाठ सिन्नर तालुक्यात २१ हजार ९७३, नाशिक तालुक्यात २१ हजार ४१४, नांदगाव तालुक्यात १२ हजार ३८०, बागलाण तालुक्यात १० हजार १०४, मालेगाव तालुक्यात नऊ हजार १६४, चांदवड तालुक्यात नऊ हजार ९०१, देवळा तालुक्यात आठ हजार २५७ याप्रमाणे रुग्ण आढळले. पहिल्या व दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने तिसरीला दोन्ही लाट पेक्षा भयानक असेल, असे संकेत दिले जात होते. परंतु परिस्थिती उलट झाल्याचे स्पष्ट झाले. त्यातही आदिवासी भागात कोविड स्थिती असून नसल्यासारखे असल्याचे दिसून आले.

Corona Fight
Corona : भय संपलेले नाही! WHO ने दिला इशारा

आदिवासी भागाने कोरोना पळविला

आदिवासी भागातील नागरिकांनी कोरोना पळविण्याचे स्पष्ट झाले. पेठ तालुक्यात पहिल्या व दुसऱ्या लाटेत ९७३ कोविड रुग्ण होते. तिसऱ्या लाटेत अवघे ३३८ रुग्ण आढळले. सुरगाणा तालुक्यात एक हजार ९८३ रुग्ण होते, तिसऱ्या लाटेत मात्र ४६४ रुग्ण आढळून आले. त्रंबक तालुक्यात चार हजार ६६६ रुग्ण आढळले होते. तिसऱ्या लाटेत ७१२ रुग्ण आढळले. इगतपुरी तालुक्यात सात ०६४ रुग्ण होते. तिसऱ्या लाटेत मात्र ८८१ रुग्ण आढळले.

तालुका निहाय एकूण तीन लाटांची कोविड आकडेवारी

नाशिक- २१ हजार ४६४ (३०३६)
बागलाण- ११ हजार ८३३ (९४९)
चांदवड- १० हजार ८३३ (९३२)
देवळा- नऊ हजार २३३ (९७६)
दिंडोरी- १२, ९२५ (१६०१)
इगतपुरी- सात हजार ९४५ (८८१)
कळवण- सहा हजार ५३७ (८६७)
मालेगाव- नऊ हजार ९१७ (७५३)

Corona Fight
नाशिक : चौथ्या लाटेपूर्वीच कोविड सेंटर साहित्याचा लिलाव | Corona

नांदगाव- १३ हजार ४०२ (१,०२२)
निफाड- २९, ३३५ (३,३६५)
पेठ- एक हजार ३११ (३३८)
सिन्नर- २४, ०२७ (२,०५४)
सुरगाणा- २,४४७ (४६४)
त्रंबक- ५, ३७८ (७१२)
येवला- ८ हजार ३१२ (८७८)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com