esakal | नाशिक जिल्ह्यात दिवसभरात २५७ रुग्ण कोरोनामुक्‍त
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Update

नाशिक जिल्ह्यात दिवसभरात २५७ रुग्ण कोरोनामुक्‍त

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : अत्‍यावस्‍थ कोरोना बाधितांना वाचविणे वैद्यकीय यंत्रणेला कठीण जाते आहे. शुक्रवारी (ता.१६) जिल्‍ह्यात आठ बाधितांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दिवसभरात १५२ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. तर २५७ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत ११३ ने घट झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात एक हजार ५४८ बाधितांवर उपचार सुरु आहेत. (152 news corona positive patients reported in nashik district)

शुक्रवारी झालेल्‍या आठ मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील पाच तर नाशिक ग्रामीण क्षेत्रातील तिघांचा समावेश आहे. नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील ५६, तर नाशिक ग्रामीण क्षेत्रातील ९१ बाधितांचा समावेश आहे. मालेगाव महापालिका क्षेत्रात एक तर जिल्‍हा बाहेरील चार रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत.

प्रलंबित अहवालांचा आकडा वाढत चालला आहे. सायंकाळी उशीरापर्यंत एक हजार ४०७ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. यात ग्रामीण क्षेत्रात सर्वाधिक ८८० अहवाल प्रलंबित असून, मालेगाव क्षेत्रात ३१४, नाशिक महापालिका क्षेत्रात २१३ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ४६१ रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ४१४ रुग्‍णांचा समावेश होता. जिल्‍हा रुग्‍णालयात दोन रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीण क्षेत्रात २९ तर मालेगावच्‍या सोळा रुग्‍णांचा यात समावेश होता.

(152 news corona positive patients reported in nashik district)

हेही वाचा: भावाने स्वतःची पर्वा न करता वाचवला बहिणीचा जीव

loading image