इंदिरानगर- सुमारे दोन तपापूर्वी उभारलेले आणि एकेकाळी नाशिकचे भूषण असलेले भूमिपुत्र, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने असलेल्या फाळके स्मारकाची सध्या दुरवस्था झाली असून, महापालिका आणि राज्य शासनाला जणू या पर्यटन स्थळाचा विसर पडला आहे की काय, अशी परिस्थिती आहे. सायंकाळी तुरळक संख्येने येणारे नागरिक आणि एकांत शोधणारे प्रेमीयुगुल एवढाच काय तो येथे पर्यटकांचा वावर उरला आहे.