esakal | VIDEO : भाजप नगरसेविकेच्या पतीने रुग्णालयात घुसविली कार; नाशिकमधील संतापजनक प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

byco hospital

VIDEO : भाजप नगरसेविकेच्या पतीने रुग्णालयात घुसविली कार; नाशिकमधील संतापजनक प्रकार

sakal_logo
By
टीम सकाळ

नाशिक रोड : येथील बिटको रुग्णालयात (bytco hospital) भाजपा नगरसेविका (bjp corporator) सीमा ताजने यांचे पती राजेंद्र ताजने यांनी इनोव्हा कार रुग्णालयात घुसवत रुग्णालयाची तोडफोड केली आहे. नगरसेविकेच्या पतीने बिटको हॉस्पिटलमध्ये गाडी घुसविली. आणि हॉस्पिटलची तोडफोड केल्याचे समजते. बिटको हॉस्पिटलमध्ये रेमडेसिव्हर इंजेक्शन मिळत नसल्याचा आरोप करत व इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचा आरोप करत मेन गेटची केली तोडफोड केल्याचे समजते.

तोडफोड होण्याची दुसरी घटना

अवघ्या काही दिवसांच्या अंतराने नाशिक शहरात हॉस्पिटलची तोडफोड होण्याची दुसरी घटना घडली. दोन्ही घटनांशी भाजपाशी संबंधित स्थानिक नेत्यांचा संबंध आहे. मानवता हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्याचा निषेधार्ह प्रकार घडला, त्याचीच पुनरावृत्ती शनिवारी (ता.15) रात्री बिटको हॉस्पिटलमध्ये घडली.

bytco

bytco

हेही वाचा: वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलणार? शासनाला पाठविणार फेरप्रस्‍ताव

bytco hospital

bytco hospital

loading image
go to top