Nashik News: कुंपणच शेत खाते तेव्हा...पोलिस उपायुक्त कार्यालयाकडून कारवाईच्या नावाखाली चेरीमेरी!

corruption
corruptionesakal

नाशिक : पोलिस आयुक्तांनी अवैध धंद्यांविरोधात कारवाईसाठी स्वतंत्र पथके नेमलेली असताना, परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त कार्यालयातील काही अधिकारी- कर्मचाऱ्यांनी पोलिस कारवाईची धाक दाखवून अंबड हद्दीतील रस्त्यावर सुगंधी तंबाखू विक्री करणाऱ्यांकडून ‘वसुली’ केल्याचा प्रकार रविवारी घडला.

मात्र, तिघांना सोडून गुन्हा चौथ्याविरोधातच दाखल करण्याची चतुराई दाखविली असली तरी या संशयास्पद कारवाईतून अनेक प्रश्‍न उभे राहत असून, कुंपणच शेत खात असल्याचा हा प्रकार घडला आहे. (corruption in name of action by Deputy Commissionerate of Police Nashik News)

पोलिस आयुक्तालय हद्दीतील अवैध धंद्याविरोधात थेट कारवाई करण्यासाठी आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार पथके तयार करण्यात आली आहे. तसेच, शहर गुन्हेशाखेच्या तीन युनिटकडून अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरू आहे.

असे असताना, परिमंडल दोनचे पोलिस उपायुक्त कार्यालयातील विशाल व नाशिकरोड पोलिस ठाण्यातील मनोहर नामक या दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुन्या सिडकोमध्ये मोटारसायकलवरून फिरून गुटखा, पानमसाला विक्री करणाऱ्या तिघांना रविवारी (ता. २९) दुपारच्या सुमारास ताब्यात घेतले.

त्यांना नाशिकरोड परिसरात नेऊन त्यांच्याकडून सदरील माल खरेदीदाराची माहिती घेतली. तसेच, पोलिस कारवाईचा धाक दाखवून त्यांच्याकडून ‘वसुली’ केली. त्यानंतर त्यांना सोडून देत चौथ्यालाच अटक करून रविवारी रात्री साडेआठला नाशिकरोड पोलिसांच्या मदतीने अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

या कारवाईसाठी या दोघांनी खासगी इनोव्हा व होंडा सिटी कारचा वापर करण्यात आला आहे. या साऱ्या प्रकाराची पोलिस वर्तुळातच नव्हे तर शहरात वाच्यता झाली आहे.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

corruption
Nashik News : NAAC नाही, तर प्रवेश नाही! मुल्‍यांकनाबाबत विद्यापीठाकडून महाविद्यालयांना सूचना

पथकाला डावलून कारवाई कशी?

आयुक्तांनी अमली पदार्थ विरोधी पथक नेमलेले आहे. नाशिकरोडचे ‘कलेक्टर’ मनोहर व परिमंडळ दोनमधील विशाल यांना जर प्रतिबंधित गुटख्याची खबर मिळाली होती तर त्यांनी ती माहिती संबंधित पथकाला देणे आवश्यक होते.

तसे न करता दोघांनी आयुक्तांच्या पथकाला डावलून अंबडच्या महाराणा प्रताप चौकात येऊन तिघा विक्रेत्यांना दुपारी खासगी वाहनातून नाशिकरोड परिसरात नेले. कारवाई जर अंबडमध्ये केली तर त्यांना अंबड पोलिस ठाण्यात नेऊन रीतसर गुन्हा नोंद करता आला असता. नाशिकरोडला का नेले, असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

तसेच, तिघांना कारवाईचा धाक दाखवून त्यांच्याकडून चौथ्याची माहिती घेतली. आधी ताब्यात घेतलेल्या तिघांकडून चेरीमेरी घेऊन सोडून दिले. अन्‌ ज्याच्याकडून तिघे माल घ्यायचे त्या चौथ्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडूनही चेरीमेरी घेण्याचाच डाव होता.

परंतु कारवाईची वाच्यता पोलिस वर्तुळातच झाल्याने त्यांनी चौथ्याला अंबड पोलिस ठाण्यात आणून रात्री साडेआठच्या सुमारास गुन्हा नोंदविला. या गुन्ह्यात सुरवातीला ताब्यात घेतलेल्या तिघांनाही आरोपी करता आले असते.

परंतु अजब प्रकार केल्याची वाच्यता सोमवारी (ता. ३०) दिवसभर शहर पोलिस वर्तुळात चर्चा होती. याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून काय कारवाई होते याकडे आता पोलिसांचेच लक्ष लागून आहे.

corruption
Nashik News: नाशिकमधील मुलींसाठीच्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेत प्रथम सत्र प्रवेश प्रक्रिया सुरू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com