येवला- दोन दशकांपासून विदर्भ, मराठवाड्यातील पांढरे सोने अर्थात, कपाशीचे पीक जिल्ह्यात चार ते पाच तालुक्यांचेही हक्काचे पीक झाले होते. मात्र काही वर्षांपासून उत्पादनात होणारी घट आणि मंदीमुळे शेतकऱ्यांना हे पीक परवडत नाही. त्यामुळे ४८ हजारांवर सरासरी क्षेत्र असलेले कपाशीचे पीक यंदा ३६ हेक्टरवरच घेतले गेले. भावही सात हजारांच्या वर गेलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पिकातून मोठा फटका बसला. येवल्यात तर सुमारे ९० टक्के क्षेत्र यंदा घटले.