Nashik: पाइप्स, सीमलेस ट्यूब निर्मितीचा देशातील पहिला कारखाना सिन्नरमध्ये! जिंदल हंटिंग एनर्जी सर्व्हिसेसचे उदघाटन

वार्षिक ७० हजार टन पाइप्सचे उत्पादन
While inaugurating Jindal Hunting Energy Services on Monday, Chairman of Jindal Saw Limited P. R. Jindal
While inaugurating Jindal Hunting Energy Services on Monday, Chairman of Jindal Saw Limited P. R. Jindalesakal
Updated on

Nashik News : समुद्रातील तेल आणि गॅसच्या उत्पादनात भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी जिंदल हंटिंग एनर्जी सर्व्हिसेस (जेएचईएसएल) या कंपनीने लोखंडी पाइप्स व सीमलेस ट्यूबसचे उत्पादन सिन्नरच्या जिंदल कंपनीमध्ये सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

तब्बल २१० कोटी (२५ मिलियन डॉलर) खर्चातून उभ्या राहिलेल्या या स्वतंत्र युनिटमध्ये दरवर्षी ७० हजार टन पाइप्सची निर्मिती होणार आहे.

अशा प्रकारचे पाइप्स व ट्यूब्सचे उत्पादन करणारी ही देशातील पहिली कंपनी असल्याची माहिती जिंदल सॉ लिमिटेडचे अध्यक्ष पी. आर. जिंदल यांनी दिली. (countrys first factory for manufacturing pipes seamless tubes in Sinnar Launch of Jindal Hunting Energy Services Nashik)

सिन्नर जवळील माळेगाव एमआयडीसीमधील जिंदल कंपनीच्या परिसरात जिंदल हंटिंग एनर्जी सर्व्हिसेस लि. या स्वतंत्र युनिटचे उदघाटन सोमवारी (ता.१८) जिंदल सॉ लिमिटेडचे अध्यक्ष पी. आर. जिंदल, हंटिंग पीएलसीचे सीईओ जिम जॉन्सन, व्यवस्थापकीय संचालक डॅनिअल टॅन, नीरज कुमार यांच्या हस्ते झाले.

पी.आर. जिंदल म्हणाले, या सुविधेची कल्पना ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून करण्यात आली आहे. तेल आणि वायू उद्योगाच्या ओसीटीजी (ऑइल कंट्री ट्युब्युलर गुड्स) क्षेत्रातील उत्पादने आणि सेवांची विस्तृत श्रेणी ऑफर करते.

या माध्यमातून देशातील पाइप्सची उणीव भरून निघेल आणि विदेशातही त्याची निर्यात होऊ शकले. जिम जॉन्सन म्हणाले, ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाच्या समर्थनार्थ, जिंदल एसएडब्ल्यू आणि हंटिंग या दोघांनी इतिहास रचला आहे.

हे उत्पादन स्थानिक ऑइल आणि गॅस उद्योगांसाठी फायद्याचे ठरेल आणि भारताच्या ऊर्जा संक्रमणामध्ये देखील भूमिका बजावेल.

डॅनिअल टॅन म्हणाले, ‘सीमलेस पाइप मिलच्या शेजारी बांधलेले जेव्ही मॅन्युफॅक्चरिंग हब आणि मुंबई बंदरात सुलभ प्रवेशासह, आम्ही केवळ भारतातील झपाट्याने वाढणाऱ्या देशांतर्गत बाजारपेठेला जागतिक दर्जाचे प्रीमिअम ओसीटीजी प्रदान करतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

While inaugurating Jindal Hunting Energy Services on Monday, Chairman of Jindal Saw Limited P. R. Jindal
Nashik Rain Update: गिरणाचा जलसाठा 10 हजार दशलक्ष घनफुटावर

मध्य, पूर्व आणि आफ्रिकेच्या बाजारपेठेतील एक महत्त्वाचे प्रवेशद्वार म्हणून सेवा देखील देतो. जेव्ही मॅन्युफॅक्चरिंग हब खरोखरच प्रीमिअम ओसीटीजी आणि घरगुती व आंतरराष्ट्रीय दोन्ही मूल्यवान ग्राहकांसाठी एक-स्टॉप शॉप असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिंदल कंपनीतील उच्च अधिकारी उपस्थित होते.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

- डिसेंबर २०२३ पासून ऑइल व गॅस काढण्यासाठी उपयोगी ठरणारे पाइप्सची निर्मिती येथे होईल

- वर्षाला ७० हजार टन पाईप्सची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट

- कमीत कमी मनुष्यबळाचा वापर

- रोबोटिक्सच्या वापरामुळे कामात अचूकता

- देशासह विदेशातील ऑइल व गॅस कंपन्यांकडून पाइप्सचे बुकिंग

- पुढील दोन वर्षांचे कंपनीकडे आगाऊ बुकिंग

- कंपनीतून शून्य टक्के वेस्टेज बाहेर पडेल, पाणी शुध्द करून त्याचा पुनर्वापर

While inaugurating Jindal Hunting Energy Services on Monday, Chairman of Jindal Saw Limited P. R. Jindal
Chhagan Bhujbal News: गरीब कुटुंबाचा गणेशोत्सव होणार गोड : छगन भुजबळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com