पान-३
---------------
NSK26H34348
नाशिक : पन्नालाल गाढवाच्या सुटकेसंदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी चर्चा करताना उपमहापौर विलास शिंदे, दीपक डोके, गोविंद भाट, उत्तम जाधव, बंटी गांगुर्डे व भाट कुटुंबीय.
------------
३६-३
‘पन्नालाल’च्या सुटकेसाठी न्यायालयीन लढा
-----------
जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेनंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांचा निर्णय
-----------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २ : कालिका यात्रोत्सवात मनोरंजनाच्या खेळासाठी वापर केल्याच्या कारणावरून गोशाळेत ठेवलेल्या ‘पन्नालाल’ या गाढवाच्या सुटकेसाठी न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह त्याच्या मूळ मालकाने घेतला आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता.२) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेत पन्नालालला मूळ मालकांच्या ताब्यात देण्यासाठी मानवीय दृष्टिकोनातून हस्तक्षेप करावा, असे विनंती करणारे निवेदन देण्यात आले.
शिवसेनेने पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असता, संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे न्यायालयात दाद मागावी असे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील आवश्यक कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील विधिज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल, असेही आश्वासन त्यांनी दिले. या पार्श्वभूमीवर पन्नालालच्या सुटकेसाठी शिवसेनेने पुढे येऊन न्यायालयीन लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पन्नालालच्या सुटकेसाठी सक्षम न्यायालयात अर्ज केला जाणार आहे. या अर्ज प्रक्रियेसाठी प्रशासनातर्फे त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वस्त केल्याबद्दल शिवसेना व भाट कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. उपमहापौर विलास शिंदे, दीपक डोके, गोविंद भाट, उत्तम जाधव, बंटी गांगुर्डे यांच्यासह पन्नालालचे मालक असलेले भाट कुटुंबीय उपस्थित होते.
---
भाट कुटुंबीय व्याकूळ
पन्नालालला त्याच्या मूळ मालक जमुनाबाई व किशन भाट यांच्या कुटुंबापासून दहा दिवसांपासून दूर आहे. वयाच्या दुसऱ्या वर्षापासून भाट कुटुंबीयांनी त्याचे संगोपन केले. सध्या तो आठ वर्षांचा असून कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्याच्यावर प्रेम करणाऱ्या मालकांपासून झालेली ताटातूट असह्य होत आहे. त्याच्या खाण्यापिण्यापासून आरोग्यापर्यंतची काळजी घेणारे भाट कुटुंबीय त्याच्यासाठी व्याकूळ झाले आहे. दसऱ्याच्या दिवशीही कुटुंबीयांनी गोशाळेत जाऊन पन्नालालची पूजा केली होती.
------------------
-