न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित

न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित
Published on: 
न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित --- २६ नोव्हेंबरपर्यंत कामबंद आंदोलनाला ब्रेक; आजपासून कामकाज पूर्ववत सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १८ : वेतनश्रेणीच्या मागणीसाठी दोन दिवसांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाला तूर्त स्थगिती देण्यात आली आहे. दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयीन कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीवर तोडगा काढण्याबाबत समितीकडून पत्र मिळाल्यानंतर २६ नोव्हेंबरपर्यंत आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवारपासून (ता. १९) न्यायालयांचे नियमित कामकाज सुरू होणार आहे. जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली १७ नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले होते. जिल्ह्यातील सुमारे ८५० कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. बुधवारी (ता. १८) आंदोलनाचा दुसरा दिवस असल्याने न्यायालयीन कामकाजावरही परिणाम झाला होता. दरम्यान, दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यासाठी स्थापन समितीने मागण्यांवर तोडगा काढण्यासंदर्भात पत्र दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नीलेश सूर्यवंशी यांनी दिली. मात्र, २६ नोव्हेंबरपर्यंत मागण्यांवर समाधानकारक तोडगा न निघाल्यास पुन्हा बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशाराही कर्मचारी संघटनेने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.