न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन
Published on: 
सेकंडमेन आहे. --- फोटोसाठी तीन कॉलम जागा सोडावी --- न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन जिल्ह्यातील ८५० कर्मचारी सहभागी; न्यायालयीन कामकाज ठप्प, वकील संघाचाही पाठिंबा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १७ : दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयीन कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेतर्फे सोमवारपासून (ता. १७) बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात शहरातील ३५० कर्मचाऱ्यांसह संपूर्ण जिल्ह्यातील सुमारे ८५० कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाजावर मोठा परिणाम झाला असून कामकाज ठप्प झाले आहे. दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यासाठी उच्च न्यायालयाने दोन न्यायमूर्तींची समिती स्थापन केली होती. या समितीने वेतनश्रेणी सुधारण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मात्र, या प्रस्तावाच्या अंमलबजावणीबाबत शासन स्तरावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी यापूर्वी काळ्या फिती लावून काम करणे, सामूहिक रजा घेणे अशा विविध टप्प्यांवर आंदोलन केले. मात्र, मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेर बेमुदत काम बंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. जळगाव जिल्हा न्यायालय परिसरात आंदोलनासाठी मंडप उभारण्यात आला असून सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा या वेळेत कर्मचारी आंदोलनाला बसत आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे. संघटनेचे अध्यक्ष श्याम शिंदे आणि नीलेश सूर्यवंशी यांनी याबाबत माहिती दिली. कंत्राटी कर्मचाऱ्यांवर भार न्यायालयीन कर्मचारी संपावर गेल्याने नियमित कामकाजासाठी केवळ २५ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आधार उरला आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी जळगाव न्यायालयातील विविध बेंचवर २७ प्रकरणांमध्ये कामकाज होणार होते. मात्र, कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे या कामकाजाला अडथळा निर्माण झाला. परिणामी, न्यायालयीन कामांसाठी आलेल्या पक्षकारांना आणि वकिलांनाही अडचणींचा सामना करावा लागला. चौकट वकील संघासह निवृत्त कर्मचाऱ्यांचा पाठिंबा या आंदोलनाला जिल्हा वकील संघानेही पाठिंबा दर्शविला आहे. जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. सागर चित्रे, ॲड. गोपाळ जळमकर, ॲड. सत्यजित पाटील, ॲड. एस. के. कौल आदींनी आंदोलनस्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना समर्थन दिले. तसेच जिल्हा वकील संघातर्फे पाठिंब्याचे पत्रही देण्यात आले. विशेष म्हणजे, या आंदोलनात निवृत्त न्यायालयीन कर्मचारीदेखील सहभागी झाले असून सुमारे २०० निवृत्त कर्मचारी शिवतीर्थ मैदानाजवळ आंदोलनाला बसले आहेत. त्यामुळे वेतनश्रेणीच्या मागणीसाठी सुरू झालेल्या या आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.