आजीकडे राहणाऱ्या बालिकेवर चुलत मामाकडून अत्याचार; पाच वर्षांनंतर प्रकार उघड

आजीकडे राहणाऱ्या बालिकेवर चुलत मामाकडून अत्याचार; पाच वर्षांनंतर प्रकार उघड
Published on: 
आजीकडे राहणाऱ्या मुलीवर चुलत मामाकडून अत्याचार -- पाच वर्षांनंतर प्रकार उघड; पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल; संशयिताला अटक सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १७ : आजीकडे राहणाऱ्या सहावर्षीय मुलीवर तिच्याच चुलत मामाने वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना तब्बल पाच वर्षांनंतर उघडकीस आली. जानेवारी २०२१ ते २०२४ या कालावधीत रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित चुलत मामाविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीची आई पुणे येथे खासगी नोकरी करते. त्यामुळे तिची सहावर्षीय मुलगी जळगावातील रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात आजीकडे राहत होती. या काळात मुलीचा चुलत मामा तेथे येत होता. घरी एकटी असल्याची संधी साधून त्याने जानेवारी २०२१ ते २०२४ या कालावधीत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. काही कालावधीनंतर मुलगी पुण्यात आईकडे गेली. त्या वेळी तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने सोमवारी (ता. १६) दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात संशयित चुलत मामाविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्याला अटक केली. संशयिताला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला शुक्रवार (ता. २०)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.