चांदोरी- निफाड तालुक्यात गोदावरी नदीत वाढत चाललेल्या पाणवेलींचा विळखा किती भयानक आहे, याचा प्रत्यय देणारी घटना शुक्रवारी (ता. ११) विठ्ठलवाडी शिवारात घडली. एक गोमाता पाणी प्यायला नदीपात्रात उतरली होती; पण पाणवेलींमुळे तिला पाणीच दिसत नसल्याने ती पुढे-पुढे जात राहिली अन बुडू लागली.