नाशिक : सण-उत्सव साजरे करण्यापूर्वी घ्यावी लागणार परवानगी

CP Deepak Pandey issued restraining orders regarding Festivals
CP Deepak Pandey issued restraining orders regarding Festivalsesakal

नाशिक : सण-उत्‍सव साजरे करण्यासाठी पोलिसांची घ्यावी लागणारी परवानगी काही दिवसांपूर्वीच वादाचा मुद्दा ठरली होती. अशात राज्‍य शासनाने निर्बंध शिथिल करताना मोठ्या उत्‍साहाने सण-उत्‍सव साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु, नाशिककरांसाठी हा आनंद औटघटकेचा ठरला आहे. बुधवारी (ता. ६) पोलिस आयुक्‍त दीपक पांडे (Commissioner of Police Deepak Pandey) यांनी प्रतिबंधात्‍मक आदेश जारी केले आहेत.

२० एप्रिलपर्यंत पोलिस आयुक्‍तालय (Commissionerate of Police) हद्दीत हे आदेश लागू राहणार असल्‍याने या दरम्‍यान येणाऱ्या सण- उत्सवाकरिता पुन्‍हा पोलिसांची रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे. राज्यात कोरोनाचे (Corona) निर्बंध पूर्ण शिथिल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना सण, उत्सव (Festivals) जल्लोषात साजरा करण्याची संधी मिळणार आहे. मात्र, सध्या मुस्लीम बांधवांचा सुरू असलेला पवित्र रमजान महिना (Ramzan Festival), तसेच पुढील काही दिवसांवर आलेले रामनवमी (Ram Navami), रामरथ व गरुडरथ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुडफ्रायडे आणि हनुमान जयंती (Hanuman Jayanti) उत्सवानिमित्त या काळात शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या उद्देशाने पोलिस आयुक्त यांनी प्राप्त अधिकारांचा वापर करत शहरामध्ये २० एप्रिल २०२२ या काळात प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू केले आहे.

CP Deepak Pandey issued restraining orders regarding Festivals
मेटघरच्या वाड्यांसाठी 4 कोटी; आठवडाभरात नळाद्वारे मिळणार पाणी

त्यामुळे शहरात पोलिस आयुक्तांच्या परवानगी शिवाय पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येवू शकणार नाही. तसेच गर्दी करण्यास, जमाव करण्यास मिरवणूक काढण्यास आणि सभा घेण्यास पूर्णतः मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे वरील सण, उत्सव साजरे करण्यापूर्वी सर्वांना पोलिस आयुक्तालयाची परवानगी घेणे आता बंधनकारक ठरणार आहे. जर या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित हा शिक्षेस पात्र ठरणार आहे.

CP Deepak Pandey issued restraining orders regarding Festivals
जामीन प्रकरणात खोटी नावे वापरून फसवणूक; गुन्हा दाखल

पुढील १५ दिवसांमधील सण

- मुस्लिम बांधवांचा सुरू असलेला पवित्र रमजान महिना

- १० एप्रिल श्रीरामनवमी

- १२ एप्रिल रामरथ व गरुडरथ

- १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

- १५ एप्रिल गुडफ्रायडे

- १६ एप्रिल हनुमान जयंती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com