नाशिक- मध्य विधानसभा मतदारसंघातील अनधिकृत जनावरांच्या गोठ्यावर कारवाई व्हावी तसेच अनियमित पाणीपुरवठ्याची व दैनंदिन समस्या सोडविण्याची मागणी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे केली. मध्य विधानसभा मतदारसंघातील विविध समस्यांबाबत आमदार फरांदे यांच्या उपस्थितीत नाशिक महापालिका आयुक्त कार्यालयात आयुक्त मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.