नाशिक रोड- नाशिक शहरात काही रिक्षाचालकांची दबंगगिरी वाढली असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतून समोर आले असतानाच नाशिक रोड भागातील काही बेशिस्त रिक्षाचालक यांच्या विरोधात मोहीम सुरू करण्यात आली आहे. .बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात पोलिसांनी मोहीम सुरू केली असून, पाच दिवसात फ्रन्टसीट- ३६७, विनानंबरप्लेट- आठ, गणवेश नसणे- ७२२, स्क्रॅप रिक्षा जमा- आठ, गुन्हेगार रिक्षाचालक असे एकूण एक हजार २६६ रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. .नाशिक रोडला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बिटको चौक आदी ठिकाणी गेल्या पाच दिवसांपासून पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर अनेक रिक्षाचालकांना शिस्त लागली आहे. अनेक रिक्षाचालकांनी फ्रन्टसीट घेणे टाळले, तर चालक आणि मालक ड्रेसकोडमध्ये दिसत होते..अनेक बेशिस्त रिक्षाचालकांची हुल्लडबाजी वाढली आल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. बिटको चौकातील जेल रोडकडे जाणाऱ्या मार्गावर, देवळाली कॅम्प व नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर अनेक रिक्षाचालक अन्य वाहनांची अडवणूक करीत वाहतुकीला अडथळा निर्माण करीत असतात. अनेकदा तर रिक्षाचालकांमध्येच प्रवाशांवरून आपापसांत हमरीतुमरी होताना दिसून येते. बाहेरगावावरून आलेल्या प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, नाशिक रोड भागात वाहतूक शाखेने अशा हुल्लडबाज रिक्षाचालकांवर कारवाई सुरू केल्याने रिक्षाचालकांना शिस्त लागेल. नाशिक रोडसह अनेक भागात काही बेशिस्त रिक्षाचालक सर्रास सिग्नल तोडून जाताना दिसून येतात..काही रिक्षाचालक बेशिस्त वागत असले तरी, अनेक प्रामाणिक रिक्षाचालकांनी आदर्शवत नियमांचे पालन करीत रिक्षा चालवून नाशिक रोडचा लौकिक कायम ठेवला आहे. यामध्ये बिटको चौकातील पवन हॉटेलशेजारील, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील, टपाल कार्यालयासमोरील रिक्षाचालक नियमांचे पालन करून प्रवाशांसोबतही प्रामाणिकपणे वागून आदर्श निर्माण करीत आहेत..बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात ही मोहीम अजून मोठ्या प्रमाणात सुरू ठेवणार असून, वेळ पडल्यास कठोर कारवाई करणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष पवार यांनी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.