NVL26B01147
चिंचखेडा : फटाकेमुक्त दिवाळीची सामूहिक प्रतिज्ञा घेताना विद्यार्थी.
--------
जय भवानी विद्यालयात
‘फटाकेमुक्त’ दिवाळी
नवलनगर, ता. ४ : ग्रामविकास मंडळ नवलनगर संचलित चिंचखेडा येथील जय भवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण मुक्त दिवाळीची प्रतिज्ञा देण्यात आली.
मुख्याध्यापक डी. एस. पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. या वेळी पर्यवेक्षक एस. जे. बोरसे यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना फटाकेमुक्त दिवाळीची प्रतिज्ञा दिली. पर्यवेक्षक बोरसे म्हणाले, फटाक्यांमुळे होणारे वायू व ध्वनी प्रदूषण, त्यामुळे लहान मुले, वृद्ध, रुग्ण व मुक्या प्राण्यांना होणारा त्रास, तसेच फटाक्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी यंदाची दिवाळी फटाकेमुक्त साजरी करावी. दिवाळीचा खरा आनंद हा स्नेह, दिवे, रांगोळी, फराळ आणि एकमेकांना शुभेच्छा देण्यात आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः फटाके न फोडता इतरांनाही याबाबत जागरूक करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी शिक्षक एस. आर. अहिरे, एम. डी. पाटील, डी. पी. भोये, बी. एच. पाटील, श्रीमती आर. जे. शिरसाठ, श्रीमती पी. एन. सूर्यवंशी, एस. व्ही. शिरसाठ, श्रीमती एन. डी. सोनवणे, ए. ए. संदांशीव, एच. ए. देसले यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.