नाशिक: क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे ठक्कर डोम येथे सुरू असलेल्या ‘नम: नाशिक प्रॉपर्टीचा महाकुंभ’ या प्रदर्शनास जोरदार प्रतिसाद मिळत आहे. घरासह विविध मालमत्ता खरेदीसाठी ग्राहकांचा ओघ सुरूच असून, एकाच ठिकाणी ५०० पेक्षा जास्त पर्याय उपलब्ध झाले आहेत. सोमवारी (ता. १८) प्रदर्शनाला भेट देण्याची शेवटची संधी असेल.