esakal | बर्थडे सेलिब्रेशन पडले महागात; नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यावर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

birthday mns

बर्थडे सेलिब्रेशन पडले महागात; मनसे कार्यकर्त्यावर गुन्हा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नाशिक : नाशिकमध्ये कोरोनाचा (corona virus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस आय़ुक्त दीपक पांडे यांनी वेळोवेळी प्रतिबंधात्मक आदेश पारित करून नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केले असतानाही मनसे कार्यकर्त्याकडून या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. (Crime-against-MNS-activist-in-Nashik-marathi-news)

नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यावर गुन्हा; सातपूर पोलीसांची कारवाई

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम अन्वये गर्दी करू नये याबाबत मनाई आदेश असतानाही मनसे विभागीय अध्यक्ष योगेश उर्फ बंटी लभडे (रा. सातपूर कॉलनी) यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांसमवेत विनामास्क व सुरक्षित अंतर न ठेवता (ता.१४) रात्री १२ च्या दरम्यान गर्दी जमवून वाढदिवस साजरा केला. त्यामुळे सातपूर पोलीसांतर्फे भा.द.वि कलम २६९,२७०, १८८, ३४ सह मपोका १३५ व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन २००५ चे कलम ५१ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त विजय खरात, सहा. पोलीस आयुक्त सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

हेही वाचा: घरपट्टी पाठोपाठ बाजार फी वसुलीचेही खासगीकरण; प्रशासनाकडून तयारी

हेही वाचा: नाशिकमध्ये 'बायो-बबल'चे नियम पाळून होणार मालिकांचे चित्रीकरण

loading image
go to top