Nashik Crime Branch : चहासाठी थांबले अन् पोलिसांनी पकडले; स्कॉर्पिओतून तलवारी व चॉपर जप्त

Crime Branch Nabs Two Criminals with Weapons : दोघा सराईत गुन्हेगारांची स्कॉर्पिओ चहाचे दोन घोट पिण्यासाठी थांबले असता, गस्तीवर असलेल्या दोघा अंमलदारांनी संशयावरून स्कॉर्पिओची झडती घेतली. त्या वेळी धारदार तलवारीसह दोन चॉपर आढळून आले.
Crime Branch
Crime Branchsakal
Updated on

नाशिक- धुळ्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या दोघा सराईत गुन्हेगारांची स्कॉर्पिओ चहाचे दोन घोट पिण्यासाठी थांबले असता, गस्तीवर असलेल्या दोघा अंमलदारांनी संशयावरून स्कॉर्पिओची झडती घेतली. त्या वेळी धारदार तलवारीसह दोन चॉपर आढळून आले. दोघा संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली असता, यातील एक संशयित धुळ्यातील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. सदर कारवाई शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हेशाखेने केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com