Nashik Crime : पोलिस सध्या करताय तरी काय? भरदिवसा बॅग लिफ्टिंग, चैनस्नॅचिंग

crime news
crime newsesakal

Nashik Crime : सोमवारी (ता. १५) रहदारीच्या स्मार्ट रोडवर दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी एकाची सोन्याचे दागिने असलेली बॅग खेचून सीबीएस सिग्नलच्या दिशेने पोबारा केला. ही घटना भरदिवसा घडली.

तर, शहरात दिवसाआड चैनस्नॅचिंगच्या घटना घडत आहेत. दुसरीकडे पोलिसांकडून शहरात चोख नाकाबंदीचा दावा केला जात असताना, या घटनांमुळे तो दावाच फोल ठरतो आहे. त्यामुळे शहर पोलिस नेमके करतात तरी काय, असा प्रश्‍न नाशिककरांसमोर उभा राहिला आहे. (crime increased in city bag lifting chain snatching neglection of police Nashik Crime news)

शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये सातत्याने गुन्हेगारी घटना घडत आहेत. उपनगरांमध्ये मारामारीच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. हत्यारे बाळगून दहशत पसरविण्याचे प्रकारही सुरूच आहेत. या साऱ्या घटना घडत असताना पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात येतात.

परंतु अशा घटनांना आळ घालण्यासाठी जो वचक पोलिसांचा असायला पाहिजे तोच न राहिल्याने गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहेत. सोमवारी (ता. १५) मनोज महाजन हे ४ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने बँकेत निघाले.

त्यासाठी स्मार्ट रोडवरील जिल्हा न्यायालयासमोर असताना, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्याकडील दागिने ठेवलेली बॅग बळजबरीने हिसकावून सीबीएसच्या दिशेने पोबारा केला. ही घटना सकाळी पावणेअकराच्या सुमारास घडली.

या वेळी या रस्त्यावर रहदारी तर असतेच, शिवाय सीबीएस चौकात एक-दोन नव्हे तर वाहतूक शाखेचा चार पोलिस तैनात असतात. या चौकात उच्चप्रतीचे सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहेत. तरीही भामट्यांनी संधी साधली.

त्यामुळे चौकात नेमलेले पोलिस कर्मचारी हे केवळ ‘पॉइंट’ वसुलीसाठीच आहेत का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या घटनेला दोन दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती अद्याप काहीही ठोस माहिती मिळालेली नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

crime news
Nashik Bribe Crime: खरेंच्या ‘लुटमारी’ची एसीबी करणार सखोल चौकशी; 3 दिवसांची पोलिस कोठडी

याचप्रमाणे, शहरात दिवसाआड महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून नेण्याचे प्रकार घडत आहेत. सोनसाखळी चोरटे येतात आणि सावज हेरून पोबाराही करतात. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोचतात.

म्हसरुळ परिसरात तर एकाच स्पॉटवर वारंवार सोनसाखळी खेचण्याचे प्रकार होत असताना संबंधित पोलिस ठाण्याकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे शहर लूटमार करण्यासाठी भामट्यांना मोकळे आहे का, असा सवाल यानिमित्ताने नाशिककरांकडून विचारला जात आहे.

चोरट्यांची मुजोरी

शहरात सातत्याने नाकाबंदी असते. नाकाबंदी वेळी वाहनांची तपासणी केली जाते. ज्या ठिकाणी सातत्याने जबरी चोरीच्या घटना घडत आहेत, त्या ठिकाणी पोलिस गस्ती वाढविण्यात आल्याचा दावा शहर पोलिसांकडून केला जात आहे.

परंतु, प्रत्यक्षात नाकाबंदी असताना चोरटे पसार होतातच कसे, असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे. जबरी चोऱ्या आणि लुटीच्या सततच्या गुन्ह्यांमुळे पोलिस नाकाबंदीचा दावा फोल ठरला आहे.

शहर पोलिसांची नाकाबंदी कागदावरच असून, प्रत्यक्षात नाकाबंदीच नसल्यामुळे चोरट्यांची मुजोरी वाढल्याचे बोलले जाते. त्यामुळे शहर पोलिस करतात तरी काय, असा उपरोधिक प्रश्‍न नागरिकांकडून विचारला जात आहे.

crime news
Trimbakeshwar Temple Controversy : "उरुसाची परंपरा नक्कीच जुनी, मात्र..." तथ्य काय? इतिहास अभ्यासक म्हणतात...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com