पंचवटी: सर्व धोत्रेंना मारून टाका, बाहेरून येऊन आम्हाला मारतील का, यांना संपवून टाका, यांना सोडू नका, अशी धमकी देत संशयित माजी नगरसेवक व भाजप पदाधिकारी उद्धव निमसेंसह पंधरा ते वीस संशयितांनी शुक्रवारी (ता. २२) सायंकाळी नांदूर नाका परिसरात धोत्रे गटातील दोघांवर प्राणघातक हल्ला केला. या घटनेत एका तरुणावर धारदार शस्त्राने वार केल्याने त्याची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात निमसेंसह जवळपास १५ ते २० संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सद्यःस्थितीत परिसरात शांतता असून, पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.