डॉ. सुवर्णा वाजे जळीत हत्याकांड ; संशयित संदीप वाजे याने लग्नातील अडथळा केला दूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. सुवर्णा वाजे जळीत हत्याकांड
डॉ. सुवर्णा वाजे जळीत हत्याकांड ; संशयित संदीप वाजे याने लग्नातील अडथळा केला दूर..

डॉ. सुवर्णा वाजे हत्याकांड ; संशयित संदीप वाजे याने लग्नातील अडथळा केला दूर

वाडीवऱ्हे : डॉ. सुवर्णा वाजे जळीत हत्याकांडातील पती संदीप वाजे या संशयित आरोपीला न्यायालयाने १६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. वाजे यांच्या कारमध्ये नऊ इंची चाकू आढळला आहे. चाकू गाडीत ठेवण्याचा काय उद्देश होता. वाजे याच्या मोबाईलमध्ये डॉ. वाजेंशी झालेले संभाषण डिलीट का केले, याचे उत्तर संशयित संदीप वाजे देऊ शकला नाही. संभाषण काय होते हे समजण्यासाठी मोबाईल फाँरेन्सिक लॅबकडे पाठविला आहे. ते मिळाल्यावर तपासाला योग्य दिशा मिळेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

डॉ. वाजेंकडून संदीप वाजे दुसरे लग्न करण्यासाठी घटस्फोट मागत होता. यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. डॉ. वाजेंच्या केबिनमध्ये मिळालेल्या चिठ्ठीत दुसरे लग्न करण्यापूर्वी त्यांनी पतीकडे मुलांच्या पालनपोषणासाठी ३० लाखांची मागणी केली होती. रक्कम वाचावी व दुसरे लग्नही व्हावे, यासाठी लग्नातील हा अडथळा दूर करण्यासाठी वाजे यांनी हे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे. घटना घडली त्या दिवशी नवीन गाडी घेतली तिची पार्टी द्यावयाची या कारणाने बाहेर जाणार असल्याचे डॉ. वाजेंना संदीप वाजे याने सांगितले होते. ही बाब त्यांनी घरी सांगितली होती; परंतु संदीप वाजे याने डॉ. वाजे यांना सायंकाळी फोन करून महामार्गावर बोलविले होते. यापर्यंतचे लोकेशन पोलिसांना मिळाले आहे. यापुढील दोघांचे लोकेशन फाँरेन्सिक लॅबकडून मिळण्याची अपेक्षा आहे. यावरूनच पुढे तपासाची दिशा मिळणार असल्याचे तपासी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Web Title: Crime News Dr Suvarna Waje Murder Case Husband Sandeep Waje Allegedly Killed Her For Second Marriage

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top