नाशिक- शहरात चाइल्ड पॉर्नोग्राफीचा वापर झाला असून, त्यात अल्पवयीन मुलांचे अश्लील व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या अज्ञात प्रोफाईल धारकांविरोधात शहर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांची यादी राज्य सायबर पोलिसांनी तयार केली आहे. चाइल्ड पॉर्नोग्राफी सर्फिंगसह अपलोडिंगचे मोठे जाळे असल्याचा पोलिसांचा संशय आहे.