नाशिक- महामार्गावरील सर्व्हिस रोडवर काही दिवसांपूर्वी अनैतिक संबंधातून भररस्त्यावर एकमेकांवर कोयता, लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ल्यात संशयित जखमी झाला असता, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यासाठी मुंबई नाका पोलिस ठाण्याचा पोलिस पहाऱ्याला असताना संशयिताने शनिवारी (ता. ७) मध्यरात्री धूम ठोकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, त्यामुळे शहर पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.