मालेगाव : शहरातील दोन दुर्घटनेत दोन चिमुकल्यांचा मृत्यू

शहरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत दोघा चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
crime update Malegaon Two children die in two accidents nashik
crime update Malegaon Two children die in two accidents nashikAccident

मालेगाव : शहरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत दोघा चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी या दुर्घटना घडल्या. यात एका दुर्घटनेत आईचा हात सुटला अन टेम्पोखाली येवून चार वर्षीय मुलगा आई-वडिलांच्या डोळ्यादेखत ठार झाल्याची हृदयद्रावक घटना साठफुटी रस्त्यावरील रजा चौक निखत पार्क गेटसमोर रविवारी (ता.२७) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

हाफिजुर रहेमान अन्सारी (वय ४, रा. नियामत बाग) हा चिमुकला वडील अन्सारी अय्याज अहमद व आई समवेत हात धरुन रस्त्याने जात होता. आईचा हात सुटला अन समोरुन भरधाव आलेल्या टेम्पोने (एमएच १२ एक्यु ६६४९) त्याला जबर धडक दिली. या टेम्पोखाली डोक्याचा भाग चेंगरुन तो जागीच ठार झाला. या अपघातानंतर परिसरातील रहिवासी संतप्त झाले होते. या भागातील अतिक्रमण व शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिवसा अवजड वाहनांना परवानगी यातून हा अपघात झाल्याची चर्चा होती. पवारवाडी पोलिसांनी कौशल्याने परिस्थिती हाताळल्याने वातावरण शांत झाले. पवारवाडी पाेलिस ठाण्यात टेम्पोचालकाविरुध्द मृत्युस कारणीभूत ठरल्याचा व अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील मोतीबाग नाका परिसरातील भीमनगर येथे घराजवळ खेळत असताना घराची भिंत अंगावर पडल्याने रत्नदीप म्हसदे (वय ८) हा चिमुकला गंभीर जखमी झाला. अंत्यवस्थ स्थितीत रत्नदीपला मामा रोहित पटाईत याने औषधोपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात नेल्यानंतर डॉ. ओम जाधव यांनी त्यास तपासून मयत घोषित केले. भिंत अंगावर पडल्याने रत्नदीन जागीच ठार झाला हाेता. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. भिंत पडल्याची व आकस्मिक मृत्युची माहिती छावणी पोलिसांनी तहसिलदार व महसूल प्रशासनास कळविली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com