मालेगाव- मुंबई १९९२-९३ मध्ये घडलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार संशयिताने मालेगाव शहरात वास्तव्य केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या व्यक्तीने शहरात एक भूखंड खरेदी करून त्यावर बांधकाम केल्याची माहिती असून, राष्ट्रीय तपास संस्थेची (एनआयए) कारवाई होण्याच्या शक्यतेमुळे तो निघून गेल्याचे नमूद करण्यात आले आहे.