नाशिक रोड परिसरातील दसक भागात असलेल्या सायट्रिक कंपनीच्या मोकळ्या मैदानात भल्या पहाटे एका युवकाचा चेहरा दगडाने ठेचलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. पोलिसांनी चौकशी सुरू केल्यावर मद्यविक्रेत्याने त्याला ओळखले. .आई, बहिणीने मृतदेह ओळखला अन् टाहो फोडला. बहिणीच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात नाशिक रोड पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला. तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी फिर्यादी बहिणीसह मृत मुलाच्या आईला अटक करीत तीन दिवसांत गुन्ह्याची उकल केली होती..मार्च २०१७ मधील घटना. सायट्रिक कंपनीच्या मोकळ्या मैदानात चेहरा ओळखू येऊ नये अशारितीने दगडाने ठेचलेल्या युवकाचा मृतदेह आढळून आला. युवकाच्या अंगावर बनियन आणि बर्मुडा होती. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. तत्कालीन पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. मयत युवकाने अतिप्रमाणात मद्यसेवन केलेले होते. .मद्याच्या नशेतच त्याचा गेम करण्यात आला असा प्राथमिक अंदाज पोलिसांचा होता. ओळख पटत नव्हती. त्याचे फोटो काढून कर्मचाऱ्यांना नाशिकरोड परिसरातील मद्यविक्रेत्यांकडे चौकशी करण्याच्या सूचना केल्या. काही तासांमध्येच एका मद्यव्रिकेत्याने त्याला ओळखले. आदल्या रात्री मयत आणि त्याच्या समवेत आणखी तीन-चार जणांनी मद्यखरेदी केल्याचे सांगितले. तसेच तो नाशिकरोडच्या पवारवाडी परिसरातील असल्याचे सांगितले. .पोलिस निरीक्षक ढोकणे यांनी तत्कालीन सहायक निरीक्षक मंगेश मसगर यांना गुन्ह्याचा तपास सोपवून त्यांना पवारवाडीत मृत युवकाच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यास रवाना केले. पोलिसांनी त्या परिसरात अनेकांना मृत युवकाचे फोटो दाखविल्यानंतर त्यावरून एका महिलेला मृत युवक ओळखीचा वाटला. त्यांना ओळख पटविण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले असता, तिने तो आपलाच मुलगा असल्याचे सांगितले. त्या वेळी मृत युवकाची आई, बहिण यांनी टाहो फोडला. त्याची बहीण शोभा (नाव बदलले आहे) हिच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला..अन् संशय बळावला मृत विनोद (नाव बदलले आहे) याच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी म्हणून वरिष्ठ निरीक्षक ढोकणे हे त्याच्या घरी गेले. घरात प्रवेश करताच, घरातील तरुण मुलगा गेल्याचे कोणतेही दुःख घरातील कोणाच्याही चेहऱ्यावर त्यांना दिसले नाही. त्यावरून ढोकणे यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पण या संशयाला आधार नव्हता. जुजबी चौकशी केल्यानंतर, विनोदची आई, मावशी, बहिणीशी बोलल्यानंतर मात्र त्यांचा संशय अधिकच बळावत गेला. .बाहेर पडल्यानंतर पोलिस वाहनात बसतानाच त्यांनी सोबतच्या कर्मचाऱ्याला ‘विनोदचा खून घरातल्यांनीच केला...’ असे म्हणाले. तो कर्मचारीही अवाक् झाला पण, साहेब शक्य नाही. एकुलता एक पोरगा होता त्यांचा. ते नाही असे काही करणार. बेवडा होता तो.. बेवड्यांनी त्याचा गेम केला असणार...’ तरीही ढोकणे त्यांच्या मतावर ठाम होते. दोन दिवसात तुला सांगतो...’ असे म्हणत ते परत पोलिस ठाण्यात आले. पक्की खबर... गस्तीवरच्या पथकांना परिसरात चौकशी करण्यास सांगितले. पण काहीही हाती लागत नव्हते. .ढोकणे यांनीही त्यांच्या खबऱ्यांकडे चौकशी केली पण त्यांनाही ठोस अशी माहिती मिळत नव्हती. दरम्यान, त्याचदिवशी एक राजकीय पदाधिकारी ढोकणे यांच्याकडे आला असता, चहा-पाणी झाल्यानंतर, ढोकणे यांनी विनोदच्या खुनाचा विषय काढला आणि तुमच्या परिसरात युवकाचा खून होतो आणि तुम्हाला काहीही माहिती नसते. तुमच्या कार्यकर्त्यांनाही काही माहिती नसते. नवल वाटते राव...’ त्यावर त्याने स्पष्टच सांगत, अहो साहेब तुम्ही मागे एकाला अटक केली ना, त्याला विचारा... त्याला सारं माहिती आहे’ असे सांगत तो निघून गेला. .ढोकणे यांनी सराईत गुन्हेगाराशी संपर्क साधला आणि पोलिस ठाण्यात यायला सांगितले. काही वेळातच तो आला आणि त्याने सगळे सांगितले. पोराला मारायची होती सुपारी विनोद दारूच्या आहारी गेला होता. घरात त्याची शिक्षिका पत्नी आणि त्याच्या आईचे अजिबात पटत नव्हते. सासू-सुनेचे भांडण आणि त्यात हा बेरोजगार अन् बेवडा या साऱ्याला वैतागून त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. तरीही विनोदचा घरात तमाशा सुरूच होता. त्याला वैतागून त्याच्या आईने सराईत गुन्हेगाराला बोलावून घेतले आणि पाहिजे तेवढे पैसे देते पण विनोदचे काहीतरी कर...’ अशी सुपारी दिली होती. .त्यानेही होकार दिला होता. पण, त्या विनोदशी आपली काहीही दुश्मनी नाही. मग का मारायचं... याच विचाराने तो टाळत होता. तर विनोदची आई त्याला सतत फोन करीत होती. वैतागून दिली सुपारी मयत विनोद बेरोजगार होता. त्यात त्याला दारुचे व्यसन जडले होते. त्याची पत्नी सिन्नर येथे शिक्षिका होती. तिच्या पैशावर तो मजा मारायचा. त्यावरून घरात सतत कटकट. सासू-सुनेचेही पटत नव्हते. अखेर ती घर सोडून माहेरी निघून गेली. .विनोद दररोज दारू पिऊन आला की, आई-बहिणीला शिवीगाळ करीत त्यांच्याभोवती तमाशा घालायला. त्याच्या पत्नीला घेऊन या म्हणायचा. मद्याच्या नशेमध्ये त्याच्यात वासनाही संचारायची. आई-बहिणीसमोरच तो नग्न व्हायचा आणि नको-नको ते करु पाहायचा. सततच्या या त्रासाला कंटाळून त्याच्या आईने सराईत गुन्हेगाराला सुपारी दिली. पण बरेच दिवस होऊनही तो विनोदचा काटा काढत नव्हता. अखेर बहिणीचा मुलगा नीलेश याला हाताशी धरले आणि कोणाकडून तरी विनोदचा काटा काढण्यास सांगितले. विनोदने काही गंजाडी पोरांना हाताशी धरले आणि त्यांना विनोदला दारू पाजण्यास सांगितले. .विनोदला भरपूर दारू पाजून सायट्री कंपनीच्या मोकळ्या मैदानात नेले. तो नशेत असतानाच त्याच्या डोक्यात दगड टाकून खून केला. चेहरा ओळखू येऊ नये म्हणून चेहराही ठेचला होता. पण पोलिसांनी गुन्ह्याची उकल करीत नीलेशसह तिघांना अटक केली. तसेच सुपारी दिल्याच्या गुन्ह्यात आई-बहिणीलाही अटक केली. याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मंगेश मसगर यांनी दोषारोपपत्र तयार करून जिल्हा न्यायालयात सादर केले. अन् खुनाची उकल... सराईत गुन्हेगाराने सुपारी घेऊनही विनोदचा गेम केला नाही. त्यामुळे त्याचा खून केला कोणी, हा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला होता. मद्यविक्रेत्याकडून विनोद आणि त्याच्याबरोबरच्या काही युवकांनी मद्यखरेदी केले होते. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने वर्णन केल्याप्रमाणे युवक ढोकणे यांच्या नजरेत आला..विनोदचा मावसभाऊ नीलेश (नाव बदलले आहे.) याने खुनानंतर तिसऱ्या दिवशी विनोदच्या आईला नाशिक रोड परिसरातील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. तिच्याजवळ नीलेश थांबलेला होता. ढोकणे, मसगर हे रुग्णालयात गेले. तब्येतीची चौकशी केल्यावर त्यांनी गोड बोलून नीलेशला बाहेर आणले आणि गाडीत टाकून पोलिस ठाण्यात आले. .Solapur Crime: साेलापूर हादरलं! 'मुलीचा बापाकडूनच खून'; शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे धकादायक कारण आलं समोर...ढोकणे यांनी थेट विषयाला हात घालतच त्याला विचारले, ‘विनोदला का मारले. खरं सांगितले तर तुला माफीचा साक्षीदार केले जाईल. तू प्रत्यक्ष काहीही केलेले नाही. सराईत गुन्हेगाराने सुपारी घेऊनही काम केले नाही म्हणून तिने दुसऱ्या पोरांकडून काम केले आहे...’ हे ऐकून नीलेशला समजून चुकले की पोलिसांना सारं माहिती झालं आहे. त्याने सारी कहाणीच सांगून टाकली अन् खुनाच्या गुन्ह्याची उकल झाली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.