नाशिक- सातपूर हद्दीतील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम फोडून दरोडा टाकणाऱ्या टोळीविरुद्ध मकोकाअन्वये गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील तीन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. बी. व्ही. वाघ यांनी सात वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा आणि प्रत्येकी तीन लाख एक हजारांचा दंड ठोठावला आहे. सदर घटना सप्टेंबर २०१९ मध्ये घडली होती.