Nashik Crime News : गोंदे येथील इसमाचा खून करणारा गुन्हेगार ग्रामीण पोलीसांच्या जाळयात

arrested
arrestedesakal

नाशिक : दिनांक ०१/०२/२०२३ रोजी सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत नाशिक पुणे महामार्गावर सिन्नरकडे . येणा-या रोडवर अन्नपूर्णा हॉटेलजवळ, धोंडवीरनगर शिवारात संपत रामनाथ तांबे, वय ३२ वर्षे, रा. गोंदे, ता. सिन्नर यास कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी धारदार शस्त्राने अंगावर वार करून त्याचा खून केल्याबाबत सिन्नर पोलीस ठाणेस गुन्हा रजि. नं. ५१ / २०२३ भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. (criminal killed man in Gonde in arrested by rural police Nashik Crime News)

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्रीमती माधुरी केदार-कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील व सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. संतोष मुटकूळे यांनी घटनास्थळी धाव घेवून घटनास्थळाची पाहणी केली.

यातील मयत इसम संपत रामनाथ तांबे यांचेबाबत सविस्तर माहीती घेतली असता, तो धोंडवीरनगर शिवार, सिन्नर येथे आयशर वाहनावर बदली ड्रायव्हर म्हणून काम करीत असल्याची माहिती मिळाली. त्याचा पुर्वेतिहास तपासला असता, त्याचेवर गतवर्षी वावी पोलीस ठाणेस इसम नामे चांगदेव सुखदेव तांबे, वय ४५, रा. गोंदे, ता. सिन्नर यांचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहीती प्राप्त झाली.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

arrested
Crime News : सीटी स्कॅन मशिनवरून महिला डॉक्टर-आरोग्य कर्मचारी भिडले; व्हिडीओ व्हायरल

यातील अपहृत इसमाचा मुलगा प्रविण चांगदेव तांबे व मयत संपत तांबे यांचे वडीलांचे अपहरण केल्याच्या कारणावरून जुना वाद होता. त्यामुळे प्रविण तांबे याचेवरील पोलीसांचा संशय बळावला. अधिक माहीती घेतली असता, प्रविण हा तळेगाव दाभाडे, पुणे येथे कामास असल्याची व घटनेच्या दिवशी तो गोंदे, ता. सिन्नर परिसरात असल्याची माहीती मिळाली.

संशयीताचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पोलीस पथके तयार करून रवाना करण्यात आली. त्यातील पुणे येथे तपासकामी गेलेल्या पोलीस पथकास संशयीत नामे प्रविण चांगदेव तांबे, वय २२, धंदा नोकरी, रा. गोंदे, ता. सिन्नर, जि. नाशिक, हल्ली रा. तळेगाव दाभाडे, जि. पुणे हा मिळून आला.

त्यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता, यातील मयत संपत तांबे याने आरोपी प्रविण तांबे यांचे वडीलांचे अपहरण केल्याचा राग मनात धरून त्याने दि ०१/०२/२०२३ रोजी सायंकाळचे सुमारास नाशिक पुणे महामार्गाने गोंदे ते सिन्नर जाणारे रोडवर मोटर सायकलने त्याचा पाठलाग केला व त्यास अन्नपूर्णा हॉटेलजवळ एकटा गाठून त्याचेकडील धारदार तलवारीने संपत याचे मानेवर, पोटावर, हातावर गंभीर वार करून जीवे ठार मारले असल्याबाबत कबूली दिली. यातील आरोपीस सिन्नर पोलीस ठाणेस हजर करण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. संतोष मुटकूळे हे करत आहेत.

arrested
Crime News : प्रेम प्रकरणातून 20 वर्षाच्या युवकाचा घोटला गळा; परखंदीत अभिषेकची निर्घृण हत्या

नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्रीमती माधुरी केदार कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अर्जुन भोसले यांनी वरील खूनाचा गुन्हा उघडकीस आणणेसाठी केलेले मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थागुशाचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील, सपोजि सागर शिंपी, पोवा नवनाथ सानप, पोना प्रितम लोखंडे, विश्वनाथ काकड, सागर काकड, किरण काकड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, वापोना भुषण रानडे, तसेच सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. संतोष मुटकूळे, पोगा चेतन मोरे, शहाजी शिंदे, पंकज देवकाते, समाधान बोराडे, कृष्णा कोकाटे, अंकुश दराडे, गौरव सानप यांनी आरोपीस ताब्यात घेवून वरील खूनाचा गुन्हा उघडकीस आणला.

पोलीसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेवून पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी तपास पथकास १५,०००/- रु. ये बक्षीस जाहीर करून सर्वांचे अभिनंदन केले आहे.

arrested
Pune Crime: शिंदे गटातील नेत्याच्या पत्नीची आत्महत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com