
Nashik Crime : मोक्कातून सुटला; MPIDत अडकला
Nashik Crime : अल्पवयीन मुलीचे तिसऱ्यांदा अपहरण करून तेलंगणात दडून बसलेल्या सराईत गुन्हेगार अक्षय युवराज पाटील (२८, रा. आनंदसागर अपार्टमेंट, श्रमिकनगर, सातपूर) यास गुंडाविरोधी पथकाने अटक केली आहे.
पाटीलविरोधात एमपीआयडी कलमान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्याची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. पाटील याच्याविरोधात खंडणीसह गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. (criminal relased from from Mokka Stuck in MPID Nashik Crime)
गेल्या वर्षी सातपूरमध्ये भाजप पदाधिकारी विक्रम नागरे यांच्याकडे खंडणी मागून दगडफेक प्रकरणामध्ये सराईत गुन्हेगार अक्षय पाटील याच्याविरोधात त्यावेली मोक्काअन्वये कारवाई करण्यात आली होती.
परंतु, वरिष्ठ पातळीवर मोक्का रद्द झाल्याने तो कारागृहातून बाहेर आला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याच्याविरोधात स्थानबद्धतेची कारवाई केली जाणार होती. परंतु त्यापूर्वीच त्याने अल्पवयीन मुलीला तिसऱ्यांदा अपहरण करून नेले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
यादरम्यान तो तेलंगणातील हैदराबादमध्ये दडून बसला होता. याबाबतची माहिती गुंडाविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना मिळाली होती. त्यानुसार, अंमलदार मंगल गुंजाळ, डी. के. पवार, प्रदीप ठाकरे, मिलिंद जगताप, मनीषा कांबळे यांनी हैदराबादमध्ये जाऊन पाटील याला ताब्यात घेतले.
संशयित अक्षय पाटील याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. स्थानबद्धतेत अटक झाल्याने त्यास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले आहे.