Nashik Bus Fire : अग्नितांडवात गंभीर जखमी प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death News

Nashik Bus Fire : अग्नितांडवात गंभीर जखमी प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक : नाशिक -औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेल चौकात झालेल्या बस -ट्रक भीषण अपघातात गंभीर जखमी प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या भीषण अपघातात यापूर्वीच १२ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. साहेबराव जाधव (५०, रा. वाशिम) असे मयत प्रवाशाचे नाव आहे.

नाशिक -औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेल चौफुलीवर८ तारखेला पहाटे भरधाव वेगातील खासगी ट्रॅव्हल्स व ट्रकमध्ये अपघात झाला. या अपघातात बसने पेट घेतल्याने १२ प्रवासी आगीत होरपळून मृत्यू तर, ३८ प्रवासी जखमी झाले होते.(Critically injured passengers died during treatment after fire bus accident Nashik News)

हेही वाचा: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 410 Travelsवर दंडाचा बडगा; RTO-पोलिसांची संयुक्त कारवाई

यात साहेबराव जाधव यांच्या मानेला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र जाधव यांची उपचारांच्या माध्यमातून जगण्यासाठी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. शुक्रवारी (ता.२१) रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी आडगाव पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: Eknath Khadse : माजी मंत्री खडसे यांच्या अडचणीत वाढ!