पिकहानीचे पंचनामे अद्याप अपूर्णच

पिकहानीचे पंचनामे अद्याप अपूर्णच
Published on: 
पिकहानीचे पंचनामे अद्याप अपूर्णच सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २६ : खानदेशात खरीप पिकांसह फळाबागांची मोठी हानी झाली आहे. शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारी केल्या. अधिकारी, लोकप्रतिनिधींचे पाहणी दौरे पूर्ण झाले. परंतु पंचनामे अपूर्णच आहेत. अनेक भागात महसुली कर्मचारी व विमा कंपनीचे प्रतिनिधी पोचलेच नाहीत. यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे. विमा कंपनीकडे नुकसान झाल्यानंतर ऑनलाइन तक्रार अनेक शेतकऱ्यांनी नोंदविली आहे. अनेक ऑनलाइन तक्रारी जळगाव, धुळे जिल्ह्यातून दाखल झाल्या आहेत. परंतु या तक्रारींची अंतिम कार्यवाही पाहणी, पंचनामे केल्यानंतर होते. ती पूर्ण झालेली नाही. काही भागात विमा कंपनी प्रतिनिधींसोबत महसुली व कृषी विभागाचे कर्मचारी येत नाहीत. तर काही भागात महसुली कर्मचारी येतात, पण विमा कंपनीचे कर्मचारी येत नाहीत. तांत्रिक अडचणीही कायम पीकविमा योजनेतून खरिपातील पिकांसंबंधी विमा संरक्षण आहे. चौकट तांत्रिक अडचणी कमी पावसाने नुकसानीसंबंधी परतावे दिले जातात. त्यासाठी नुकसान झाल्यानंतर तक्रार विमा कंपनीकडे नोंदवायची असते. अनेक शेतकऱ्यांना ही तक्रार नोंदविताना तांत्रिक किंवा नेटवर्क व अन्य अडचणी आल्या. काही शेतकऱ्यांना मोबाईल हाताळता येत नसल्याने तक्रार नोंदविता आलेली नसल्याचीदेखील माहिती आहे. तर काही शेतकऱ्यांच्या तक्रारीच या पोर्टलवर दाखल होवू शकल्या नाहीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com