उंबरठाण येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी; शेतकऱ्यांच्या व्यथा पाहून आमदारांच्या डोळ्यांत आले पाणी

उंबरठाण येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी; शेतकऱ्यांच्या व्यथा पाहून आमदारांच्या डोळ्यांत आले पाणी
Published on: 
फोटो : 09699 उंबरठाण ः अतिवृष्टीमुळे आडव्या पडलेल्या भात पिकाची पाहणी करताना आमदार नितीन पवार. शेजारी तहसीलदार रामजी राठोड व अधिकारी. उंबरठाण ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करताना आमदार नितीन पवार. आमदार नितीन पवारांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी कळवण, ता. ९ : आमदार नितीन पवार यांनी गुरुवारी (ता. ९) उंबरठाण येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती व पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. पीक नुकसानीच्या पंचनाम्यांची पाहणी करत शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. तहसीलदार रामजी राठोड, कृषी व महसूल विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते. अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे उंबरठाण परिसरातील भात पिके आडवी पडली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. कष्टाने उभे केलेले पीक डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झाल्याचे पाहून शेतकऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण होते. ही गंभीर परिस्थिती पाहून आमदार नितीन पवार यांनाही भावना अनावर झाल्या. शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, पंचनामे वस्तुनिष्ठ व योग्य पद्धतीने करून बाधित शेतकऱ्यांना नियमानुसार तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार पवार यांनी या वेळी सांगितले. आमदार पवार यांनी सुरगाणा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वस्तूनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना या वेळी केल्या. ............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com