तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित पीक पाहणी नोंदणीचा मार्ग मोकळा

तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित पीक पाहणी नोंदणीचा मार्ग मोकळा
Published on: 
प्रलंबित पीक पाहणी नोंदणीचा मार्ग मोकळा सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. ८ : डिजिटल पीक पाहणी प्रक्रियेत तांत्रिक अडचणींमुळे पीक नोंदणीपासून वंचित राहिलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रलंबित पीक पाहणी नोंदणी पूर्ण करण्यासाठी संबंधित गटांकरिता ओसीयू सुविधा आता ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. मालेगाव तालुक्यात डिजिटल पीक पाहणी करताना काही तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांच्या विशिष्ट गटांमध्ये पीक नोंदणी करणे शक्य होत नव्हते. परिणामी, अनेक शेतकऱ्यांची पीक पाहणी नोंदणी प्रलंबित राहिली होती. ही समस्या लक्षात घेऊन मंत्री भुसे यांनी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करून प्रलंबित नोंदणीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. या अनुषंगाने संबंधित गटांसाठी ओसीयू सुविधा ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे यापूर्वी तांत्रिक अडचणींमुळे पीक पाहणी नोंदणी करता न आलेल्या गटांची नोंदणी आता ग्राम महसूल अधिकाऱ्यांमार्फत पूर्ण करणे शक्य होणार आहे. ज्या शेतकऱ्यांची पीक पाहणी नोंदणी अद्याप प्रलंबित आहे किंवा तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्या शेतगटांची नोंदणी होऊ शकलेली नाही, अशा शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या संबंधित तलाठ्यांशी संपर्क साधावा व पीक पाहणी नोंदणी पूर्ण करून घ्यावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.