नामपूर- शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता चार वर्षांपासून सुरू असलेल्या सुमारे ३४ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरात नागरिकांना सहा ते सात दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नामपूरकरांच्या घशाला मात्र कोरड पडली आहे.