Shravan Somvar: श्री पिनाकेश्वरच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी! 50 हजार लोकांनी घेतले दर्शन

Devotees throng to see Lord Mahadev at Pinakeshwar.
Devotees throng to see Lord Mahadev at Pinakeshwar.esakal

Shravan Somvar : नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासून उत्तरेस सात किलोमीटर अंतरावरील डोंगराच्या शिखरावर असलेल्या जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शिवालय म्हणून ओळख असलेल्या श्री पिनाकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी (ता.२१) भाविकांची एकच गर्दी झाली.

संपूर्ण दिवसभरात विविध जिल्ह्यातून आलेल्या ५० हजार भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले. (Crowd of devotees for darshan of Shri Pinakeshwar 50 thousand people took darshan nashik)

श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारमुळे श्री पिनाकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी पहाटे तीनपासून भाविकांनी गर्दी करण्यास सुरवात केली. अबालवृद्धांसह महिला, तरूण भाविकांची संख्या यावेळी मोठी होती.

यातच अधूनमधून हलक्या स्वरूपात श्रावणी सरी देखील बसरत होत्या. पिनाकेश्वर महादेवास खानदेशमध्ये मोठा महादेव आणि मराठवाड्यात नवसाला पावणारा महादेव नावाने ओळखल्या जाते.

सोमवारी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होणार असल्याचे दृष्टीने ट्रस्ट आणि पोलिस प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात आले होते. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शनरांगा होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Devotees throng to see Lord Mahadev at Pinakeshwar.
Shravan 2023 : श्री. बाणेश्वर मंदिरात पहिला श्रावणी सोमवार व नागपंचमी निम्मित भक्तांच्या रांगा

दर्शनबारी, मंदिराचा सभामंडप व मंदिर आणि बाहेरच्या परिसर या सर्व भागात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून कॅमेरे बसवलेले असल्याने येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस बांधवांना त्याचप्रमाणे स्वयंसेवकांना सर्व परिसरात नजर ठेवणे सोपे झाले आहे.

भाविकांना सुलभ दर्शन व्हावे म्हणून देवस्थानचे विश्वस्त पंढरीनाथ पवार, शिवाजी वर्पे, कैलास तुपे, नाना थोरात, नाना पवार आदींसह सर्व विश्‍वस्त, स्वयंसेवक, ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.

Devotees throng to see Lord Mahadev at Pinakeshwar.
Shravan Somvar: बम भोलेच्या गजराने रामतीर्थ दुमदुमले! पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त महादेवाच्या चरणी भाविक लीन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com