नाशिक : लग्‍नसराई, सुट्यांमुळे बसस्‍थानकावर प्रवाशांच्‍या रांगा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bus stand

नाशिक : लग्‍नसराई, सुट्यांमुळे बसस्‍थानकावर प्रवाशांच्‍या रांगा!

नाशिक : लग्‍नसराई (wedding season) आणि सुट्यांमुळे (Holiday) प्रवासीसंख्येत वाढ झाल्‍याचे बघायला मिळाले. रविवारी (ता. १३) शहरातील नवीन सीबीएस (CBS) बसस्‍थानकावर प्रवाशांच्‍या तिकिटासाठी रांगा लागल्‍याचे चित्र होते, तर पुण्यासह औरंगाबाद, धुळे व अन्‍य मार्गांसाठी प्रवासीसंख्येत वाढ झाल्‍याचे आढळले.

तिकीट मिळविण्यासाठी मोठी रांग

एसटी कर्मचाऱ्यांचा अघोषित संप सुरू असला, तरी एसटी बससेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. नाशिक विभागातून दैनंदिन दोनशेहून अधिक बसगाड्या धावू लागल्‍या आहेत. रविवारी नवीन सीबीएस बसस्‍थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी बघायला मिळाली. येथील बहुतांश बसगाड्या विनावाहक सोडल्‍या जात असल्‍याने बसचे तिकीट मिळविण्यासाठी प्रवाशांची मोठी रांग लागल्‍याचे चित्र अनुभवायला मिळाले. जिल्‍हाबाहेरील व लांब पल्ल्‍याच्‍या मार्गांसाठी खासगी शिवशाही उपलब्‍ध करून दिल्‍या जात आहेत. जुने सीबीएस परिसरातून जिल्‍हांतर्गत मार्गांसाठी बसगाड्या सोडण्यात येत आहेत. सध्या बहुतांश प्रवासी लग्‍नसराईनिमित्त प्रवास करीत असल्‍याने त्‍यांच्‍याकडील बॅग व इतर साहित्‍यही मोठ्या प्रमाणावर राहत आहे.

हेही वाचा: वाईन विक्रीला विरोध करणारे अण्णा हजारे शेतकऱ्यांसोबत

खासगी ट्रॅव्‍हल्‍सचीही चांदी

एसटी महामंडळाच्‍या बसगाड्यांसमवेत खासगी ट्रॅव्‍हल्‍सच्‍या गाड्यांनाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मिळेल त्‍या वाहनाने प्रवासावर भर दिला जात असल्‍याने खासगी ट्रॅव्‍हल्‍सचालकांचाही चांगला व्‍यवसाय सध्या होत आहे. अनेक ठिकाणी आगाऊ नोंदणी करून बसगाड्या उपलब्‍ध करून दिल्‍या जात आहेत.

हेही वाचा: ''शिवभोजन केंद्रावरील गैर प्रकार खपवून घेणार नाही''

Web Title: Crowd Of Passengers At Bus Stand Due To Weddings And Holidays Nashik Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top