गोदाघाटाला चौपाटीचा फिल; स्नानासाठी गर्दी

गोदाघाट
गोदाघाटesakal

पंचवटी (जि. नाशिक) : गोदापात्रात वाहणारे स्वच्छ व झुळूझुळू पाणी, थंडगार मंद वारा सोबतीला पाणीपुरी, भेळपुरीचा आस्वाद. गेल्या काही दिवसांपासून सायंकाळनंतर मोठी गर्दी उसळत असल्याने गोदाघाटाला सध्या चौपाटीचा फिल आला आहे. वाढत्या तापमानवाढीने नाशिककर हैराण झाले आहेत. त्यातच दिवसभराच्या उकाड्यावर तोडग्यावर उतारा शोधण्यासाठी सद्या गंगाघाटावर सायंकाळी अनेकजण सहकुटुंब फेरफटका मारण्यासाठी येत आहेत. त्यामुळे गांधी तलाव, खंडेराव महाराज पटांगण आदी ठिकाणी मोठी गर्दी उसळत आहे.

गोदाघाटाच्या अर्थकारणासही काही प्रमाणात बूस्ट

पंधरा दिवसांपासून गंगापूर धरणातून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे कोरडीठाक पडलेली गोदावरी सध्या प्रवाहित झाली आहे. पात्रातील स्वच्छ पाण्यामुळे अनेकांना स्नानाचा मोह आवरत नसल्याने गांधी तलाव, रामकुंड भागात दिवसभर स्नानासाठी गर्दी उसळत आहे. दुपारी तर अनेकजण थेट दुचाकी घेऊन रामकुंड गाठत असल्याने गांधी स्मारकाजवळ यात्रेचे स्वरूप प्राप्त होत आहे. याशिवाय अहिल्यादेवी होळकर पुलाखालील मोऱ्यांखाली स्नानासाठीही गर्दी उसळत आहे. दुपारनंतर गांधी तलावालगत तसेच गाडगे महाराज पुलालगत खाद्यपदार्थांच्या मोठ्या प्रमाणावर गाड्या लागतात. या ठिकाणी भेळ, भत्ता, आइस्क्रीम, पाणीपुरी खाण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी उसळत आहे. त्यामुळे गोदाघाटाच्या अर्थकारणासही काही प्रमाणात बूस्ट मिळत आहे. सकाळ सायंकाळच्या सुमारास तपोवनातही भाविक पर्यटकांची गर्दी उसळत आहे.

गोदाघाट
पावसाच्या माहेरघरीच पाण्याचा वनवा; पाण्यासाठी जीव धोक्यात

‘स्मार्ट’ कामे संथगतीने

गेल्या कित्येक महिन्यांपासून रामकुंडालगत ‘स्मार्ट’ कामे सूरू आहेत. त्यामुळे सकाळ सायंकाळ या ठिकाणी वाहतुकीची कोंडी अनुभवण्यास मिळते. भूमिगत गटारींची ही कामे त्वरित पूर्ण व्हावीत, अशी या भागातील व्यावसायिकांसह विधीसाठी येणाऱ्या भाविकांनी मागणी आहे. स्मार्ट कामामुळे गंगाघाटावरील वाहतूक कोंडी आता नित्याचीच झाली आहे. रामकुंड, सरदार चौक, सांडव्यावरील देवी मंदिर, साईबाबा ब मंदिर, सरदार चौक या भागात ही कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. त्यातच आता सरदार चौकाकडून रामंदिराकडे जाणारा रस्ता खोदण्यात आल्याने याकोंडीत भरच पडत आहे.

गोदाघाट
'गरिबांचा फ्रिज' घेण्याकडे कल वाढला; विक्रेत्यांची भरभराट

बोटिंग बंदच

सध्या गांधी तलावात मोठ्या प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे पर्यटकांसह धार्मिक कार्यासाठी येणाऱ्यांना रामकुंडासह गांधी तलावाची भुरळ पडत आहे. मात्र, पाणी असूनही येथील बोटिंग गत काही महिन्यांपासूनच बंदच आहे. बोटिंग बंद असल्याने गांधी तलावातील फेरफटकाही थांबला असल्याने पर्यटकांना हिरमोड होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com