पंचवटी- खर्च अमाप आणि काही वर्षांपासून उत्पन्न शून्य अशा विचित्र अवस्थेत असलेल्या पंचवटीतील पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर सांस्कृतिक भवनचे तब्बल सव्वाचार कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले. स्मार्टसिटीने सदर काम करून हे भवन महापालिकेकडे वर्ग केल्याचा दावाही केला जात आहे.