सायबर जागरुकता ही तांत्रीक बाब नसून जीवनशैलीचा भाग बनवा : डॉ. सोमनाथ वडनेरे

सायबर जागरुकता ही तांत्रीक बाब नसून जीवनशैलीचा भाग बनवा : डॉ. सोमनाथ वडनेरे
Published on: 
NSK26H33600 (डॉ. सोमनाथ वडनेरे) ––––––– सायबर जागरूकता जीवनशैलीचा भाग बनवा (उपशीर्षक) डॉ. सोमनाथ वडनेरे : शहरात सायबर सुरक्षेवर व्‍याख्‍यान सकाळ वृत्‍तसेवा जळगाव, ता. २६ : डिजिटल जगात सुरक्षित राहण्यासाठी केवळ तंत्रज्ञानाचा वापर पुरेसा नसून डिजिटल साक्षरता, सतर्कता आणि जबाबदार जबाबदारीने ऑनलाइन व्यवहार करणे आवश्यक आहे. डिजिटल युगात सायबर सुरक्षितता ही केवळ तांत्रिक गरज नसून जीवनशैलीचा अत्यावश्यक भाग बनविण्याची गरज असल्याचे मत डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात आयोजित ‘सायबर सुरक्षा’ विषयावर बोलत होते. सुरक्षित संगणक, सुरक्षित डेटा आणि सुरक्षित जीवनशैली– हेच सुरक्षित डिजिटल जीवनाचे महत्त्वाचे सूत्र सांगून सायबर सुरक्षितता ही केवळ एका व्यक्तीची किंवा संस्थेची जबाबदारी न मानता, प्रत्येक नागरिकाने स्वीकारलेली जीवनशैली बनली पाहिजे. आज आपण डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगाशी जोडले गेलो आहोत. मात्र या जोडणीसोबत सायबर फसवणूक, माहितीची चोरी आणि ऑनलाइन गुन्हे यांचे धोकेही वाढले आहेत. त्यामुळे ‘थांबा, तपासा आणि मगच विश्वास ठेवा’ हा मंत्र प्रत्येकाने अंगीकारणे आवश्यक आहे. चौकट सुरक्षिततेचे नियम पाळा प्रत्येक नागरिकाने सायबर सुरक्षिततेचे नियम आत्मसात करून सुरक्षित डिजिटल समाजाच्या निर्मितीत योगदान द्यावे, तंत्रज्ञानाचा वापर निर्भयपणे, पण जबाबदारीने करून सुरक्षित, सजग व सायबर गुन्हेमुक्त डिजिटल भारताच्या निर्मितीसाठी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com