Cyber Crime Alert : ऑनलाइन व्यवहार करताना सावधान! | latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cyber crime alert

Cyber Crime Alert : ऑनलाइन व्यवहार करताना सावधान!

नाशिक : आगामी सण- उत्सवाच्या काळात ऑनलाइन खरेदीसाठी आकर्षक आणि भरमसाट सवलतीच्या योजना विविध कंपन्यांकडून केल्या जातात. या आकर्षक योजनांमुळे ग्राहकही ऑनलाइन खरेदीकडे आकर्षित होतात.

मात्र, यासाठी ऑनलाइन व्यवहार करताना नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. या पार्श्‍वभूमीवर नाशिक सायबर पोलिसांकडून नागरिकांना ऑनलाइन खरेदीसाठी आर्थिक व्यवहार करताना सावधगिरीचे आवाहन केले आहे. (Cyber ​​Crime Alert Be careful while doing online transactions by cyber police Nashik latest marathi news)

आठवडाभरावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यापाठोपाठ नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी आदी सण- उत्सव आहेत. या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन खरेदीचा पेव सुटणार आहे. वस्तूंच्या विक्रीसाठी ऑनलाइन खरेदीवर आकर्षक सूट दिली जाते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या कालावधीत ई-व्यवहार वाढल्यास गुन्ह्यांत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अनेक व्यवहार ऑनलाइन होतात. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी गुन्हे शाखेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उपायुक्त संजय बारकुंड, सहाय्यक आयुक्त वसंत मोरे, सायबरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी ऑनलाइन गस्त वाढविली आहे.

तर, दुसरीकडे या कालावधीत गणेशोत्सवात मंडळे, निवासी सोसायटी, विविध क्लबसहित शाळा- महाविद्यालये, संस्थांमध्ये प्रबोधन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. पोलिसांकडून त्यासाठी नियोजन होत असून, प्रबोधनासाठी इच्छुक संस्थांनाही पोलिसांशी संपर्क साधता येणार असून, त्यासाठी ०२५३-२३०५२२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयुक्तालयाने केले आहे.

हेही वाचा: Nashik : संरक्षण भिंतीच्या तारेत अडकलेल्या बिबट्याची सुटका

अनोळखी व्यक्तीशी ई-व्यवहार टाळावेत

भारतीय सैन्यात नोकरीस असल्याचे भासवून बदली झाल्याने स्वस्तात वाहने वा किमती वस्तू विक्री करण्याचे सांगत ऑनलाइन फसवणूक केली जाते.

बिल न भरल्याने वीज जोडणी खंडित करण्याचा इशारा देऊन, वा विविध ॲप लोनच्या माध्यमातून व क्लोन ॲपमार्फत मोबाइलचा ताबा घेऊन भामटे ऑनलाइन आर्थिक व्यवहार करतात. उत्सवकाळात अनोळखी व्यक्तीशी ई-व्यवहार टाळावेत असेही आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा: Crime Update : कारमधून फिरणाऱ्या नग्न साधूने दोघांना लुटले

Web Title: Cyber Crime Alert Be Careful While Doing Online Transactions By Cyber Police Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..