जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये सायबर जनजागृती अभियान

जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये सायबर जनजागृती अभियान
Published on: 
सूचना : विषयानुरुप ‘एआय’ चित्र वापरावे ---- जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये सायबर जनजागृती अभियान ------ पोलिसांचे आवाहन; डिजिटल अरेस्ट, बनावट गुंतवणुकीपासून सतर्क राहा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२ : महाराष्ट्र सायबर कार्यालयाच्या आदेशानुसार ऑक्टोबर महिना सायबर जनजागृती महिना म्हणून साजरा केला जात आहे. डिजिटल युगात इंटरनेट व मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्याचबरोबर सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची विविध माध्यमांतून फसवणूक करण्याचे प्रकारही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिस दलातर्फे नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी नागरिकांना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. १४-१ शाळा-महाविद्यालयांत जनजागृती या माध्यमातून विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक व ग्रामीण भागातील नागरिकांना सायबर गुन्ह्यांचे स्वरूप व त्यापासून बचावाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात येणार आहे. १४-२ ओटीपी, पीन, सीव्हीव्ही कुणालाही देऊ नका सायबर फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी आपली गोपनीय माहिती कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नये. एटीएम पासवर्ड, ओटीपी, यूपीआय पीन, सीव्हीव्ही, बँक खात्याची माहिती किंवा अन्य संवेदनशील माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नये. अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या संशयास्पद लिंक, संदेश किंवा ई-मेलवर क्लिक करू नये. सोशल मीडियावरून आलेल्या आकर्षक ऑफर्स, नोकरीची संधी, गुंतवणुकीत मोठा परतावा किंवा कर्जाचे आमिष दाखविणाऱ्या संदेशांची खातरजमा केल्याशिवाय कोणतीही आर्थिक व्यवहार करू नये. ----- (चौकट) ‘डिजिटल अरेस्ट’ला घाबरू नका सध्या सायबर गुन्हेगारांकडून ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली नागरिकांना धमकावून पैसे उकळण्याचे प्रकार केले जात आहेत. पोलिस अधिकारी, केंद्रीय तपास यंत्रणा किंवा अन्य शासकीय यंत्रणेच्या नावाचा वापर करून पैसे उकळले जातात. अशा कॉल्सवर विश्वास न ठेवता तातडीने संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा. ------ (चौकट) तातडीने १९३० वर संपर्क सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी वेळ न घालवता तातडीने राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in या अधिकृत सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार नोंदवावी. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com