मोबाईल हॅक करून साडेआठ लाखांवर डल्ला

मोबाईल हॅक करून साडेआठ लाखांवर डल्ला
Published on: 
मोबाईल हॅक करून साडेआठ लाखांवर डल्ला सायबर भामट्यांकडून दोघांना १२ लाखांना गंडा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ५ : सणासुदीत सायबर भामट्यांनी दोघांना जाळ्यात ओढून तब्बल साडेबारा लाखांवर डल्ला मारला आहे. यातील एकाचा मोबाईल हॅक करून बँक खात्यातील साडेआठ लाख वर्ग करून घेतले, तर दुसऱ्याच्या व्हॉटसॲपला एपीके फाईल पाठवून त्या माध्यमातून चार लाखांवर डल्ला मारला आहे. मोबाईल हॅक करून एका ६१ वर्षीय व्यावसायिकाच्या बँक खात्यातून ८ लाख ५४ हजार ३३२ रुपये लांबवल्याची सायबर गुन्ह्याची घटना समोर आली आहे. समशेरसिंग राऊतसिंग चौधरी (रा. हरीओम लँडमार्क, पाथर्डी फाटा) यांचा मोबाईल २६ ऑक्टोबरला दुपारी संशयिताने हॅक करून त्यांच्या बँक खात्यातील ८ लाख ५४ हजार ३३२ रुपयांची रक्कम परस्पर वर्ग करून फसवणूक केली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, उपनिरीक्षक शिरसाट तपास करत आहेत. तर, मोबाईलवर एपीके फाईल पाठवून फोनचा सर्व ॲक्सेस मिळवत निवृत्त कर्मचाऱ्याच्या खात्यातून ३ लाख ८७ हजार रुपये लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. श्रीकांत शंकर जोशी (६७, रा. ग्रीन बिल्डिंग, टाकळी रोड) हे २७ ऑक्टोबरला सकाळी घरात असताना त्यांच्या मोबाईलवर अज्ञाताने एपीके फाईल पाठवली. जोशी यांनी ती फाईल ओपन करताच भामट्याने त्यांच्या मोबाईलचा पूर्ण ॲक्सेस मिळवला. त्यानंतर त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून १७ हजार व ३ लाख ७० हजार असे एकूण ३ लाख ८७ हजार रुपये परस्पर काढून घेतले. उपनगर ठाण्यात गुन्हा दाखल असून, निरीक्षक सुनील बडे तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.