''डिजिटल अरेस्ट''ची भीती दाखवून वृद्धेला ७१ लाखांचा गंडा

''डिजिटल अरेस्ट''ची भीती दाखवून वृद्धेला  ७१ लाखांचा गंडा
Published on: 
''डिजिटल अरेस्ट''ची भीती दाखवून दोन ज्येष्ठांना ७१ लाखांचा गंडा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २० : डिजिटल अरेस्ट आणि मनी लाँड्रिंगची भीती दाखवून सायबर भामट्यांनी एका ज्येष्ठाची तब्बल ७१ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत ऑनलाइन कस्टमर केअर क्रमांकावर संपर्क साधणे एका वृद्धाला ९८ हजारांना महागात पडले आहे. सायबर पोलिसात ज्येष्ठाने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना २८ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान संशयित सीमा रॉय, विक्रम सिंग, राकेश अग्रवाल व त्यांच्या साथीदारांनी फिर्यादींशी संपर्क साधत काश्मीर येथील दहशतवाद्यांकडे तुमचे आधारकार्ड मिळाले असून, तुमच्या नावाने बँक खाते उघडून ७० कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग झाल्याचा बनाव त्यांनी रचला. त्यासाठी त्यांनी ज्येष्ठाला डिजिटल अरेस्ट केल्याचे भासवून त्यांच्या आर्थिक तपासणीच्या नावाखाली त्यांच्या बँक खात्यातील रक्कम संशयितांनी दिलेल्या बँक खात्यावर वर्ग करण्यास भाग पाडले. सायबर भामट्याच्या या जाळ्यात अडकून ज्येष्ठाने तब्बल ७१ लाख रुपये वर्ग केले. परंतु, त्यानंतर संशयितांनी कोणताही संपर्क न केल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी शहर सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ------ कस्टमर केअर नंबरावरून ऑनलाइन फसवणूक गंगापूर रोडवरील सावरकर नगर भागात राहणाऱ्या ७७ वर्षीय निवृत्त ज्येष्ठाची ऑनलाइन ९७ हजार ८८ रुपयांची फसवणूक झाली. दिलीप दामोदर बिडवई (७७, रा. रुचिता हाईटस्, सावरकर नगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना १४ ऑक्टोबरला सायंकाळी पाच ते आठच्या दरम्यान इंडियन बँकेच्या सर्च केलेल्या कस्टमर केअर नंबरला कॉल केला. त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी एसबीआयच्या खात्यातून २५ रुपये पाठवले. त्यानंतर भामट्याने त्यांच्या खात्यातून टप्प्या-टप्प्याने ९७ हजार ८८ रुपये लांबवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com