पाटील कनिष्ठ महाविद्यालयात सायबर सिक्युरिटी विषयावर मार्गदर्शन

पाटील कनिष्ठ महाविद्यालयात सायबर सिक्युरिटी विषयावर मार्गदर्शन
Published on: 
MSI26B09782 साक्री : ‘सायबर सिक्युरिटी’ विषयावर मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलिस अधिकारी ओंकार गवळी. --------------- बदलत्या गुन्ह्यांमुळे विद्यार्थ्यांनी सजग राहावे ओंकार गवळी : पाटील महाविद्यालयात ‘सायबर सिक्युरिटी’वर मार्गदर्शन सकाळ वृत्तसेवा म्हसदी, ता. २२ : बदलत्या काळानुसार गुन्ह्यांचे स्वरूप देखील बदलत असून, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अशा परिस्थितीत सुरक्षित राहण्यासाठी सजग राहणे गरजेचे असल्याचे मत उपविभागीय पोलिस अधिकारी ओंकार गवळी यांनी व्यक्त केले. साक्रीत विद्या विकास मंडळाच्या सीताराम गोविंद पाटील कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात ‘सायबर सिक्युरिटी’ या विषयावर ते बोलत होते. प्राचार्य डॉ. अनंत पाटील अध्यक्षस्थानी होते. उपप्राचार्य डॉ. ज्ञानेश्‍वर चव्हाण उपस्थित होते. श्री. गवळी यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल व त्यासोबतच इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या वापराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मोबाईल वापरताना वापरले जाणारे वेगवेगळे ॲप्लीकेशन तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित साधने वापरताना आपली व्यक्तिगत माहिती सुरक्षित राहील. तसेच, कोणत्याही गुन्ह्यात आपला सहभाग राहणार नाही याची काळजी घेणे काळाची गरज असल्याचे सांगत चुकून किंवा एखाद्या हेतूने केले गेलेले वर्तन आपल्याला एखाद्या गुन्ह्याचा भाग करणार नाही यासाठी विद्यार्थ्यांनी दक्ष राहावे व वेळीच पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन केले. प्राचार्य डॉ. अनंत पाटील यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या व सर्व नागरिकांच्या संरक्षणार्थ पोलिस कर्मचारी बांधव सदैव तत्पर असून, सजग नागरिक म्हणून विद्यार्थ्यांनी पोलिसांना नेहमी सहकार्य करणे गरजेचे असल्याची अपेक्षा व्यक्त केली. आपल्या आजूबाजूला किंवा इतरत्र कुठेही गुन्हा घडणार नाही, यासाठी सजग राहतानाच कायद्याचे पालन व्यक्तिगत जीवनात करणे देखील महत्त्वाचे असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले. प्रा. चेतन पदमर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. कमलेश सूर्यवंशी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com