गोंदेदुमाला: नांदगाव बुद्रुक (ता. इगतपुरी) शिवारात ग्रामस्थांच्या सतर्कतेने व वाडीवऱ्हे पोलिसांच्या तत्परतेने दरोडेखोरांना जेरबंद करण्यात आले. शुक्रवारी (ता. २२) रात्री साडेदहाला नांदगाव ते साकूरदरम्यान दारणा धरणाजवळील मोरीशेजारी सात ते आठ दरोडेखोर तीन मोटारसायकलवरून (ट्रिपल सीट) आले. त्यांनी रस्त्याच्या कडेला थांबून हातात कोयते, लोखंडी गज व लाठ्या घेतल्या होत्या. गावकऱ्यांच्या हाती ही माहिती लागताच परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले.